आता चंद्रपूर जिल्ह्यात नाकाबंदी दरम्यान पोलीस बाळगणार शस्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 11:24 AM2018-11-08T11:24:30+5:302018-11-08T11:25:44+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात नाकाबंदी दरम्यान पोलीस शस्त्र बाळगणार असून, त्यांच्यावर जर कुणी प्राणघातक हल्ला चढवत असेल तर त्या शस्त्राचा वापर करून ते स्वसंरक्षण करू शकतात, असे निर्देश चंद्रपूरचे पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी बुधवारी यंत्रणेला दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात नाकाबंदी दरम्यान पोलीस शस्त्र बाळगणार असून, त्यांच्यावर जर कुणी प्राणघातक हल्ला चढवत असेल तर त्या शस्त्राचा वापर करून ते स्वसंरक्षण करू शकतात, असे निर्देश चंद्रपूरचे पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी बुधवारी यंत्रणेला दिले.
नागभीडचे प्रभारी ठाणेदार छत्रपती चिडे यांच्या अंत्यसंस्कारासमयी ते उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त निर्देशाची माहिती दिली. गुंंडांशी आता कठोरपणे वागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ते म्हणाले, चंद्रपूर जिल्हा शांत जिल्हा असल्याने नाकाबंदीच्या वेळी पोलीस शस्त्र सोबत बाळगत नव्हते. आता आम्ही निर्देश दिले आहेत की पोलिसांनी शस्त्र सोबत बाळगावे. जर कोणी अंगावर गाडी घालत असेल आणि त्यात जीव जाणार असेल तर स्वसंरक्षणार्थ गाडी चालवणाऱ्यावर गोळ्या झाडण्याचे निर्देश दिले आहेत.