आता रोजगारयुक्त विकासाचे लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 11:36 PM2017-08-28T23:36:38+5:302017-08-28T23:37:12+5:30

चंद्रपूर शहर सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने भरारी घेत आहे. विकास कितीही केला तरी पोटाची भूक शमत नाही.

Now the target of employment development | आता रोजगारयुक्त विकासाचे लक्ष्य

आता रोजगारयुक्त विकासाचे लक्ष्य

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : चंद्रपूरच्या २३१ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहर सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने भरारी घेत आहे. विकास कितीही केला तरी पोटाची भूक शमत नाही. यापुढे विकासासोबतच रोजगाराभिमुख विकास हे लक्ष्य असणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी येथे केले.
चंद्रपूर जिल्ह्याच्या पुढील ५० वर्षांच्या आवश्यकतेला लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या अमृत अभियानाअंतर्गत २३१ कोटींच्या स्वयंचलित पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. या वेळी केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, आ. नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मनपा आयुक्त संजय काकडे, उपमहापौर अनिल फुलझले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, सभागृह नेता वसंतराव देशमुख, सभापती अनुराधा हजारे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, माजी महापोर राखी कंचर्लावार, जि.प. सभापती ब्रिजभूषण पाझारे, विजय देशमुख विराजमान उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्याची स्मार्ट शहराच्या योजनांमध्ये समावेश नसला तरी या शहराला स्मार्ट शहरासाठी ठरविण्यात आलेली मानके आपण पूर्ण करू. एकेदिवशी स्मार्ट शहरातील अधिकारीच चंद्रपूर हे स्मार्ट बघण्यासाठी स्वत: येतील, अशा शब्दात ना. मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचा कायापालट करण्याचा निर्धार केला.
ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, केंद्र, राज्य व महानगर पालिका प्रशासनाचा वाटा असणाºया या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण शहराच्या पुढील ५० वर्षातील पेय जलाचे नियोजन करण्यात येत आहे. १६ नवीन पाण्याच्या टाकी, ५२७ किलोमीटर लांबी असणारी अंतर्गत पाईपलाईन, नवीन पंपींग मशिन आणि केवळ एका स्क्रिनवर कार्यान्वित असणारी स्वयंचलित पाणीपुरवठा योजना हे या अमृत योजनेचे वैशिष्ट्ये आहेत.
माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसाला २५ डिसेंबर २०१८ रोजी या योजनेचा शुभारंभ व्हावा, असा संकल्पही त्यांनी सोडला. या शहरातील बदल अनुभवताना प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे, या साठी देखील आपण प्रयत्नरत असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. या योजनेसाठी पाण्याचे स्त्रोत्र म्हणून लवकरच आमडी, धानोरा या ठिकाणी बंधारा बांधण्याचे कामही सुरू होईल, असेही स्पष्ट केले.
महापौर अंजली घोटेकर यांनी देखील या वेळी उभय नेत्यांचे ही योजना अंमलात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. जनतेला ही योजना पुर्ण सुविधेसह विक्रमी वेळेत देण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे यांनी केले. संचलन प्रशांत आरवे यांनी केले. कार्यक्रमाला महानगरपालीकेचे सर्व नगर सेवक, पदाधिकारी व शहरातील मान्यवर उपस्थित होते.
महाकाली मंदिर व परिसराचा विकास साधणार -हंसराज अहीर
केंद्र असो वा राज्य सरकार चंद्रपूरचा विकासासाठी आमचा भक्कम पाठपुरावा सुरू आहे. अनेक योजना आगामी काळात शहरात येतील. शहराचा चेहरा मोहरा बदलत असून केंद्र शासनामार्फत मंजूर झालेल्या अमृत योजनेतून पाणी पुरवठयाची घडी नीट बसेल, असे प्रतिपादन केंद्र्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर यांनी केले. या वेळी महाकाली मंदिर व परिसराच्या विकासासाठी १० कोटी रुपये निधी मंजूर केल्याचेही ना. अहीर म्हणाले. येत्या काळामध्ये चंद्रपूर ते पुणे नवीन रेल्वे सुरू करण्याबाबत आपला प्रयत्न अंतिम टप्यात असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूरला अनेक सुपरफास्ट रेल्वेसाठी थांबा मिळणार असल्याचे सूतोवाचही ना. अहीर यांनी यावेळी केले.
स्मार्ट शहरांपेक्षाही चंद्रपूर स्मार्ट शहर करू
चंद्रपूरचा स्मार्ट शहराच्या यादीत उल्लेख झाला नाही. मात्र या स्मार्ट शहरांना लाजवेल असे चंद्रपूरला स्मार्ट करण्याची ग्वाही ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. स्मार्ट शहराचा विकास करण्यासाठी जी मानके ठरविली आहे. ती सर्व चंद्रपुरात दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात येईल. इतकचे नव्हे, तर त्याही पुढे जावून या शहराचा विकास करण्याचा आपला प्रयत्न आहे. स्मार्ट शहरातील अधिकारी चंद्रपूरला बघायला येतील, ही दृष्टी या विकासात असेल, असे ना. मुनगंटीवार म्हणाले. शहरात सर्वत्र एलईडी दिवे लावले जाणार आहे. शहरातील रस्तेही रुंद करण्याची नितांत गरजही ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

Web Title: Now the target of employment development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.