आता झाडच देईल स्वत:बद्दलची विविध भाषांत माहिती; चंद्रपूरच्या वन प्रबोधिनीचा अभिनव उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2022 12:19 PM2022-11-25T12:19:56+5:302022-11-25T12:26:29+5:30

वनप्रबोधिनी परिसरातील झाडेही आता बोलू लागली; ‘क्यूआर कोड’चे लोकार्पण

Now the tree itself will give information about itself in various languages; 'QR Code' launched by Forest Minister Sudhir Mungantiwar | आता झाडच देईल स्वत:बद्दलची विविध भाषांत माहिती; चंद्रपूरच्या वन प्रबोधिनीचा अभिनव उपक्रम

आता झाडच देईल स्वत:बद्दलची विविध भाषांत माहिती; चंद्रपूरच्या वन प्रबोधिनीचा अभिनव उपक्रम

Next

चंद्रपूर : झाडाची संपूर्ण माहिती, त्याचे उपयोग, आदी बाबी जाणून घेण्यासाठी चंद्रपूर येथील वन प्रबोधिनीने अभिनव उपक्रम राबवून झाडावर ‘क्यूआर कोड’ विकसित करण्यात आला. विशेष म्हणजे या ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून आता झाड स्वत:बद्दलची माहिती स्वत:च देणार आहे. क्यूआर कोडचे लोकार्पण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

‘टॉकिंग ट्री’ म्हणजेच ‘बोलणारे झाड’ असा हा उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत चंद्रपूर वन प्रबोधिनीच्या परिसरातील विविध प्रजातींची झाडे मोबाइलद्वारे ओळखता येऊ शकणार आहेत. प्रत्येक प्रजातीची सविस्तर माहिती दृकश्राव्य माध्यमातून उपलब्ध होणार आहे. वन प्रबोधिनी परिसरातील प्रत्येक झाडावर पाटीस्वरूपात क्यूआर कोड लावण्यात येणार आहे. ‘टॉकिंग ट्री’ या मोबाइल ॲपद्वारे क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित झाड स्वत:बद्दल विविध भाषांमध्ये माहिती देणार आहे.

वन प्रबोधिनी परिसरात मोठ्या प्रमाणात वन व वनेतर प्रजातींची झाडे असून या ॲपच्या वापरामुळे परिसरातील जैवविविधतेबद्दल अधिकाधिक माहिती जाणून घेणे शक्य होणार आहे. ‘क्यूआर कोड’चे लोकार्पण केल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, विसापूर येथे तयार होणाऱ्या बॉटनिकल गार्डनमध्येही वन विभागाने हा उपक्रम राबवावा. या उपक्रमाचा विस्तार गंगोत्रीप्रमाणे करण्यासाठी वन विभागाने नियोजन करावे. झाडावर क्यूआर कोडची अभिनव संकल्पना राबविल्याबद्दल वनमंत्र्यांनी प्रबोधिनीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी यांचे कौतुक केले.

यावेळी कॅम्पचे प्रधान मुख्य संरक्षक शैलेश टेंभुर्णे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक जितेंद्र रामगावकर, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, वन प्रबोधिनीचे सल्लागार मंगेश इंदापवार उपस्थित होते.

Web Title: Now the tree itself will give information about itself in various languages; 'QR Code' launched by Forest Minister Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.