न.प. कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

By Admin | Published: July 16, 2014 12:05 AM2014-07-16T00:05:43+5:302014-07-16T00:05:43+5:30

राज्य सरकारने नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या न्याय मागणीकडे दुर्लक्ष केल्याने कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मंगळवारपासून कर्मचारी आंदोलनात उतरले असून

N.P. Employees' unqualified assets | न.प. कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

न.प. कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

googlenewsNext

चंद्रपूर: राज्य सरकारने नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या न्याय मागणीकडे दुर्लक्ष केल्याने कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मंगळवारपासून कर्मचारी आंदोलनात उतरले असून नगरपालिकेपुढे धरणे आंदोलनाने संपाची सुरूवात झाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर, मूल, ब्रह्मपुरी, राजुरा, भद्रावती, वरोरा येथील नगरपालिकांचे कर्मचारी मंगळवारी धरणे आंदोलनाला बसले. यामुळे पहिल्याच दिवशी नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला नगरपालिका, महानगरपालिका कर्मचारी महासंघाने पाठिंबा दिल्याने १०० टक्के कर्मचाऱ्यांचा या आंदोलनात सहभाग झाला आहे.
संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या १९ मागण्या पूर्ण झाल्याशिवाय संपातून माघार घेणार नाही, असा ठाम निर्धार केल्याने नगरपालिका व्यवस्थापन कोलमडण्याची चिन्हे आहेत. परिणामी नागरिकांची कामे प्रभावित होणार आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात न.प. कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याने शालेय विद्यार्थी व सर्वसामान्य जनतेला याचा मोठा फटका बसणार आहे.
भारतीय नगरपरिषद कामगार संघाने कर्मचाऱ्यांचे वेतन १०० टक्के शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे देण्यात यावे, अनुकंपाधारकांच्या नेमणूका स्थायी व अस्थायी पदाची अट न घालता तात्काळ भरती करावी, सफाई कामगारांना मोफत घरे बांधून देण्यात यावी, नक्षलग्रस्त क्षेत्रातील न.प.कर्मचाऱ्यांना १५ टक्के अतिरिक्त भत्ता देण्यात यावा, २४ वर्षांची कालबद्ध पदोन्नती तात्काळ लागू करावी, यांसह तब्बल १९ मागण्या शासनाकडे केल्या आहेत.
बल्लारपूर नगरपालिकेत महाराष्ट्र प्रदेश कामगार संघाचे प्रदेशाध्यक्ष रामगोपाल मिश्रा, जिल्हाध्यक्ष सुरेश आंबेकर, सरचिटणीस तुकड्यादास डुंबरे, महिला प्रतिनिधी हंसाराणी आर्य, अनिल बंडीवार, भद्रावती नगरपालिकेत अध्यक्ष पी.एस. मांडवकर, अभियंता गुप्ता, संतोष नामोजवार, सुनिल मेश्राम, विजय डुकरे, अलका पिदूरकर, पी.के.वाणी, प्रभाकर उंबरकर, अजय लडके, अरविंद भुसारी, ब्रह्मपुरी येथे आर.एस.ठोंबरे, व्ही.डब्ल्यू शेंडे, मनोज मासूरकर, एम.एन.मालोदे, एम.आर. दवे आदींच्या नेतृत्वात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. (लोकमत चमू )

Web Title: N.P. Employees' unqualified assets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.