न.प. कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय लेखणी बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:28 AM2021-04-16T04:28:27+5:302021-04-16T04:28:27+5:30
राज्यातील न.प. तसेच नगर पंचायतमध्ये सफाई, पाणीपुरवठा व इतर विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना नियमित वेतन दिले जात नाही. त्यामुळे संसाराचा ...
राज्यातील न.प. तसेच नगर पंचायतमध्ये सफाई, पाणीपुरवठा व इतर विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना नियमित वेतन दिले जात नाही. त्यामुळे संसाराचा गाडा चालवताना त्यांचे आर्थिक बजेट नेहमी कोलमडले जाते. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन नियमितपणे अदा केले जात नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे. आपल्या मागण्यांसंदर्भात यापूर्वी कर्मचारी संघटनेने अनेकदा आंदोलन केले. त्याचा उपयोग झाला नाही. म्हणून गुरुवारी एकदिवसीय लेखणी बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची दखल शासनाने २५ एप्रिलपर्यंत घ्यावी. अन्यथा १ मे कामगार दिनापासून ध्वजारोहणानंतर सर्व अत्यावश्यक सेवेसह सर्व कर्मचारी बेमुदत आंदोलन करतील, असा इशारा निवेदनातून महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटना शाखा वरोराच्या वतीने देण्यात आला आहे.