साथीच्या आजाराबाबत न.प.वर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 10:53 PM2018-10-06T22:53:18+5:302018-10-06T22:53:36+5:30

वरोरा शहरातील कोलमडलेल्या आरोग्य व स्वच्छता व्यवस्थेमुळे शहरात डेंग्यूच्या रूग्णात झपाट्याने वाढ होत आहे. यासंदर्भात शहर काँग्रेसच्या नेतृत्वात नागरिकांनी नगरपालिकेवर धडक दिली. मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांच्याशी चर्चा करुन शहरातील अस्वछतेबाबत तात्काळ उपाययोजना व कार्यवाही करण्याची मागणी केली.

NP on strike against pandemic | साथीच्या आजाराबाबत न.प.वर धडक

साथीच्या आजाराबाबत न.प.वर धडक

Next
ठळक मुद्देकाँग्रेसचे नेतृत्व : तात्काळ उपाययोजना करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : वरोरा शहरातील कोलमडलेल्या आरोग्य व स्वच्छता व्यवस्थेमुळे शहरात डेंग्यूच्या रूग्णात झपाट्याने वाढ होत आहे. यासंदर्भात शहर काँग्रेसच्या नेतृत्वात नागरिकांनी नगरपालिकेवर धडक दिली. मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांच्याशी चर्चा करुन शहरातील अस्वछतेबाबत तात्काळ उपाययोजना व कार्यवाही करण्याची मागणी केली.
वरोरा शहरात मागील काही दिवसांपासून डेंग्यू, मलेरीया, टाईफाईड व इतर साथीच्या आजाराच्या रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. या आजारांमुळे शहरात काही रुग्ण दगावल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते डॉ.विजय देवतळे व शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विलास टिपले यांच्या नेतृत्वात नागरिकांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांची भेट घेतली.
शहरात झपाट्याने वाढत असलेल्या डेंग्यूच्या रुग्णांमुळे नागरिकांमधे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील अस्वछता, साचलेली घाण, डुकरांचा मुक्त संचार, मोकाट जनावरे, तुंबलेल्या नाल्या, याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. नाल्यांमधे नियमितपणे जंतुनाशक स्प्रे फवारणी, नियमितपणे फॉग मशीनद्वारे धूर फवारणी, नाल्या सफाई व कचऱ्याची विल्हेवाट योग्य रितीने करून शहर स्वच्छतेकडे जातीने लक्ष देण्याची मागणी केली. नागरिकांच्या आरोग्य व जीवनाशी संबधित या बाबींवर तात्काळ उपाययोजना व कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला. नगर पालिकेच्या बिघडलेल्या फॉगींग मशीनीची तात्काळ दुरुस्ती, डुकरांचा बंदोबस्त, नाल्या सफाई व स्वच्छतेबाबतचे आश्वासन मुख्याधिकाºयांनी शिष्टमंडळाला दिले.
यावेळी नगरसेवक विठ्ठल टाले, माजी नगरसेवक सोमदेव कोहाड, प्रतिमा जोगी, मेघश्याम सिडाम, अरूण फुंदे, विजय पुरी, दुर्गा ठाकरे, शिरोमणी स्वामी, ज्योती मगरे, नरेश गांधी, गिरीधर कष्टी, संतोष गुंडावार, मनिष जयस्वाल, मनोहर स्वामी, गंगाधर कारेकार, मंगेश मसाडे, संदीप दिडमीशे, दीपक मिश्रा, बबनसिंह ठाकूर, अमित चोरडीया, बालाजी बल्की, दीपक घुडे, गणपत ताजणे, बंडु कष्टी, शंकर गोवारदिपे आदी उपस्थित होते.

Web Title: NP on strike against pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.