अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या पन्नाशीच्या आत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:33 AM2021-08-25T04:33:31+5:302021-08-25T04:33:31+5:30
बाधित आढळलेल्या दोन रूग्णांमध्ये वरोरा व बल्लारपूर तालुक्यातील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्र, चंद्र्रपूर तालुका, ...
बाधित आढळलेल्या दोन रूग्णांमध्ये वरोरा व बल्लारपूर तालुक्यातील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे.
चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्र, चंद्र्रपूर तालुका, भद्रावती, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजूरा, चिमूर,कोरपना, जिवती तालुक्यात एकही रूग्ण आढळला नाही. जिल्ह्यात बाधितांची संख्या ८८ हजार ६०८ वर पोहोचली आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८७ हजार २९ झाली आहे. सध्या ४० बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६ लाख ६२ हजार ८३२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५ लाख ७२ हजार ५८४ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १५३९ बाधितांचे मृत्यू झाले आहे. कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.