आठवडाभरापासून घसरतेय कोरोना रुग्णांची संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:26 AM2020-12-24T04:26:22+5:302020-12-24T04:26:22+5:30

चंद्रपूर : मागील आठवडाभरापासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. दररोज अडीचशे, तीनशेच्या संख्येत आढळणारे रुग्ण आता ...

The number of corona patients has been declining since last week | आठवडाभरापासून घसरतेय कोरोना रुग्णांची संख्या

आठवडाभरापासून घसरतेय कोरोना रुग्णांची संख्या

googlenewsNext

चंद्रपूर : मागील आठवडाभरापासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. दररोज अडीचशे, तीनशेच्या संख्येत आढळणारे रुग्ण आता १०० च्या आणि काही वेळा ५० च्या आत आढळत आहेत. दुसरीकडे कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या केवळ ६४४ वर आली आहे.

जिल्ह्यात मागील बुधवारी ५४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर २७ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २१ हजार ९७८ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २० हजार ९७८ झाली आहे. सध्या ६४४ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ६६ हजार ३७० नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ४२ हजार ३०२ नमुने निगेटीव्ह आले आहेत.

बुधवारी नव्याने बाधित झालेल्या २७ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील नऊ, बल्लारपूर दोन, भद्रावती तीन, ब्रम्हपुरी एक, मूल चार, चिमूर दोन, वरोरा चार व इतर ठिकाणच्या दोन रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

बॉक्स

आतापर्यंत जिल्ह्यात ३२९ बाधितांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत ३५६ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३२९ बाधितांचा समावेश आहे. उर्वरित मृत्यूमध्ये तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १६, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

बॉक्स

निवडणुकीच्या रणधुमाळीत काळजी आवश्यक

कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी कोरोनाचे संकट अद्याप गेलेले नाही. अशातच सध्या गावागावात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या रणधुमाळीत नागरिकांच्या भेटीगाठी आल्या. चौकाचौकात चर्चेच्या फडी आल्या. अशावेळी कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

Web Title: The number of corona patients has been declining since last week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.