राजुरा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या शून्य; ३६ गावे कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:29 AM2021-08-15T04:29:01+5:302021-08-15T04:29:01+5:30
राजुरा : राजुरा तालुक्यात आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या अधिनस्त आरोग्य कर्मचारी यांच्या प्रयत्नातून राजुरा तालुक्यातील ३६ गावात ...
राजुरा : राजुरा तालुक्यात आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या अधिनस्त आरोग्य कर्मचारी यांच्या प्रयत्नातून राजुरा तालुक्यातील ३६ गावात कोरोना रुग्ण आढळले नाहीत. यामुळे ही गावे कोरोनामुक्त ठरली आहे.
तालुक्यात कोरोनाचा कहर संपुष्टात आल्यामुळे सध्या रुग्णांची संख्या शून्य आहे. राजुरा तालुक्यात एकूण १२९ गावे व गुडे आहे. लोकसंख्या १ लक्ष ७ हजार व राजुरा शहराची लोकसंख्या ३५ हजार आहे. राजुरा येथे उपजिल्हा रुग्णालय व चिंचोली, कढोली व देवाडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या तालुक्यातील १३ गावात १०० टक्के लसीकरण झाले आहे. भुरकुंडा, मंगी बु. व खु. चिंचोली, विहीरगाव, धिडसी, सुमठाना, बोरगाव, राजीगुडा, गोवारी कालनी, चनाखा, कढोली, खौरगुडा येथे लसीकरण जवळपास पूर्ण झाले आहे. उर्वरित गावातील लोकांना कोरोना आजाराची तीव्रता समजवून लसीकरण आरोग्य कर्मचाऱ्यांकडून पर्यंत केले जात आहे.