Corona Virus in Chandrapur; चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १९ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 10:27 AM2020-05-24T10:27:33+5:302020-05-24T10:38:06+5:30

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे २३ मे रोजी रात्री १५ पर्यंत पोहोचलेली पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मध्यरात्री नंतर वाढून १९ झाली आहे.

The number of corona positive patients in Chandrapur district is 19 | Corona Virus in Chandrapur; चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १९ वर

Corona Virus in Chandrapur; चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १९ वर

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे २३ मे रोजी रात्री १५ पर्यंत पोहोचलेली पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मध्यरात्री नंतर वाढून १९ झाली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार २३ मे च्या रात्री उशिरा नागपूर येथून प्राप्त अहवालामध्ये चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यापैकी दोन रुग्ण वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आहेत. तर दोन रुग्ण संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत.
यामध्ये मुंबईवरून आलेला मौजा वरवट येथील पंचवीस वर्षाच्या युवकांचा समावेश आहे. हा युवक १७ मे रोजी अन्य सहा लोकांसोबत मुंबईवरून चंद्रपूर येथे आला होता. या युवकाला संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. २२ मे रोजी स्वॅब नमुना घेण्यात आला होता.
घुगुस येथील पंचवीस वर्षीय महिला १४ मे रोजी पुण्यावरून आली होती. ती होम कॉरेन्टाइन होती. लक्षणे दिसून आल्यामुळे २२ मे रोजी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल झाली. २२ रोजी या महिलेचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते.
नाशिक मालेगाव येथून आलेल्या रुग्णांच्या संपकार्तील मूल तालुक्यातील चिरोली येथील २७ वर्षीय व्यक्तीला संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या युवकाचा स्वब नमुना २२ मे रोजी घेण्यात आला होता.
पुण्यावरून आलेल्या २८ वर्षीय दुर्गापूर येथील युवक होम क्वारंटाईन होता. २१ ला लक्षणे दिसल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल झाला होता. २२ मे रोजी या युवकाचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते.
या चारही युवकांचे स्वॅब नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या १९ पैकी १८ रुग्ण चंद्रपूरमध्ये आहेत. पाहिला रूग्ण कोरोनामुक्त झाला आहे.
चंद्रपूरमध्ये २ मे ( एक रुग्ण ), १३ मे ( एक रूग्ण) २० मे ( एकूण १० रूग्ण ) आणि २३ मे ( एकूण ७ रूग्ण ) या चार तारखांना आतापर्यंत १९ रुग्ण पॉझिटीव्ह ठरले आहे.

Web Title: The number of corona positive patients in Chandrapur district is 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.