कोरोनाबाधितांची संख्या शंभरीच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:20 AM2021-06-11T04:20:16+5:302021-06-11T04:20:16+5:30

८८ नवे रुग्ण आढळले तर दोघांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधितांची संख्या शंभरीच्या आता आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आज ...

The number of coronadoids is within a hundred | कोरोनाबाधितांची संख्या शंभरीच्या आत

कोरोनाबाधितांची संख्या शंभरीच्या आत

Next

८८ नवे रुग्ण आढळले तर दोघांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधितांची संख्या शंभरीच्या आता आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपुरातील मातानगर, भिवापूर येथील ४४ वर्षीय पुरुष तर राजुरा तालुक्यातील नाईकनगर येथील ७४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८३ हजार ९६५ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८१ हजार २९६ झाली आहे. सध्या १ हजार १७९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५ लाख ६ हजार ५५९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४ लाख १९ हजार ५२७ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४९० बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १३७९, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली ४०, यवतमाळ ५१, भंडारा ११, वर्धा एक, गोंदिया तीन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे. नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

पाच तालुक्यांत एकही रुग्ण नाही

आज बाधित आढळलेल्या ८८ रुग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील ३७, चंद्रपूर तालुका ८, बल्लारपूर १३, भद्रावती ६, नागभीड १, सिंदेवाही २, पोंभुर्णा १, राजुरा ७, चिमूर १, वरोरा ८, कोरपना ३ आणि इतर ठिकाणच्या एका रुग्णाचा समावेश आहे. ब्रह्मपुरी, मूल, सावली, गोंडपिपरी, जिवती तालुक्यात २४ तासात एकही कोविड बाधित आढळला नाही.

Web Title: The number of coronadoids is within a hundred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.