कोरोनामुक्तीचा आकडा बाधितांपेक्षा तिप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:27 AM2021-05-23T04:27:42+5:302021-05-23T04:27:42+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासात १०७१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे, तर ३७७ ...
चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासात १०७१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे, तर ३७७ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून १७ बाधितांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे नव्याने बाधित होणाऱ्यांचा आकडा आता घसरत असून शनिवारी तर बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण तिप्पट होते.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८० हजार ६०० वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ७२ हजार ९९८ झाली आहे. सध्या सहा हजार २४६ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत चार लाख ५३ हजार ९८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी तीन लाख ६९ हजार ८८१ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
बॉक्स
२४ तासांतील मृत्यू
मागील २४ तासांमध्ये मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील ४२ वर्षीय महिला, घुटकाळा वार्ड येथील ५४ वर्षीय पुरुष, बाबुपेठ येथील ३८ वर्षीय पुरुष, पंचशील चौक परिसरातील ६० वर्षीय महिला, पठाणपुरा वार्ड परिसरातील ५२ वर्षीय महिला, नेहरू नगर परिसरातील ५५ वर्षीय पुरुष, यशवंत नगर परिसरातील ५० वर्षीय महिला, बल्लारपूर तालुक्यातील गौरक्षण वार्ड येथील ६८ वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय पुरुष, ५३ वर्षीय पुरुष, राजुरा तालुक्यातील सोनुर्ली येथील ५० वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील शेगाव येथील ४७ वर्षीय महिला, ५४ वर्षीय पुरुष, कढोली येथील ६५ वर्षीय महिला. कोरपना तालुक्यातील ५० वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय पुरुष तर तेलंगणा राज्यातील कागजनगर येथील ४८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बॉक्स
तालुकानिहाय नवे बाधित
चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रा- १०३
चंद्रपूर तालुका- २६
बल्लारपूर- ४९
भद्रावती-३३
ब्रह्मपुरी- २३
नागभीड- १२
सिंदेवाही- १४
मूल- ८
सावली-६
पोंभूर्णा-५
गोंडपिपरी-६
राजूरा-२८
चिमूर-९
वरोरा-१७
कोरपना-२८
जिवती-८
इतर-२
नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.