नव्या बाधितांचा आकडा पुन्हा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 05:00 AM2020-10-29T05:00:00+5:302020-10-29T05:00:16+5:30

नव्या बाधितांमध्ये इंदिरा नगर अयोध्या चौक परिसर, दुर्गापूर, शक्तीनगर, जुनोना चौक बाबुपेठ, संजय नगर, बालाजी वार्ड, नकोडा, घुग्घुस, एकोरी वार्ड, शास्त्रीनगर, अंचलेश्वर वार्ड, अरविंद नगर, गौतम नगर, पठाणपुरा, नगीना बाग, चिचपल्ली, ऊर्जानगर, साईकृपा कॉलनी परिसर, तुकूम, इंदिरानगर, पडोली, विठ्ठल मंदिर वार्ड, राजीव नगर, वडगाव, स्नेह नगर, सुशील नगर, शिवाजीनगर, घुटकाळा वार्ड भागातून बाधित ठरले आहे.

The number of new victims increased again | नव्या बाधितांचा आकडा पुन्हा वाढला

नव्या बाधितांचा आकडा पुन्हा वाढला

Next
ठळक मुद्दे२२८ बाधितांची भर : आतापर्यंत १२१९९ बाधित कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात नव्याने बाधित होणाऱ्यांची संख्या या आठवड्यात बऱ्यापैकी कमी होत होती. मात्र बुधवारी पुन्हा हा आकडा वाढला आहे. शुक्रवारी जिल्ह्यात नव्या २२८ बाधितांची भर पडली आहे.
आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या १५ हजार २७७ वर पोहोचली आहे. तसेच शुक्रवारी १५१ बाधित कोरोनातून बरे झाले असून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १२ हजार १९९ झाली आहे. सध्या दोन हजार ८५१ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख १७ हजार ६९६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ८७८ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
नव्या बाधितांमध्ये इंदिरा नगर अयोध्या चौक परिसर, दुर्गापूर, शक्तीनगर, जुनोना चौक बाबुपेठ, संजय नगर, बालाजी वार्ड, नकोडा, घुग्घुस, एकोरी वार्ड, शास्त्रीनगर, अंचलेश्वर वार्ड, अरविंद नगर, गौतम नगर, पठाणपुरा, नगीना बाग, चिचपल्ली, ऊर्जानगर, साईकृपा कॉलनी परिसर, तुकूम, इंदिरानगर, पडोली, विठ्ठल मंदिर वार्ड, राजीव नगर, वडगाव, स्नेह नगर, सुशील नगर, शिवाजीनगर, घुटकाळा वार्ड भागातून बाधित ठरले आहे.

चार बाधितांचा मृत्यू
शुक्रवारी जिल्ह्यात चार बाधितांचा मृत्यू झाला आहे. यात चिमूर तालुक्यातील ७६ वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील ७० वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी शहरातील पेठ वार्ड येथील ७२ वर्षीय पुरुष व भद्रावती येथील ७० वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २२७ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २१४, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली चार, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
असे आहेत तालुकानिहाय नवे बाधित
नव्या बाधितांमध्ये १२४ पुरूष व १०४ महिलांचा समावेश आहे. यात चंद्रपूर शहर व परिसरातील १०१, पोंभूर्णा तालुक्यातील तीन, बल्लारपूर तालुक्यातील आठ, मूल तालुक्यातील २२, गोंडपिपरी तालुक्यातील दोन, जिवती तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील १२, ब्रह्मपुरी तालुक्यातील २७, नागभीड तालुक्यातील १४, वरोरा तालुक्यातील सात, भद्रावती तालुक्यातील आठ, सावली तालुक्यातील दोन, सिंदेवाही तालुक्यातील सात, राजुरा तालुक्यातील एक, गडचिरोली १२ तर भंडारा येथील एकाचा समावेश आहे.

ग्रामीण भागातील नवे बाधित
वरोरा तालुक्यातील दत्त मंदिर वार्ड, शांतीवन लेआउट परिसर, माढेळी, बोर्डा, जिजामाता वार्ड परिसरातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील मेढंकी, शेष नगर, विद्यानगर, शांतीनगर, अरेर नवरगाव, हनुमान नगर, भवानी वार्ड, गजानन नगर, बोंडेगाव, पेठ वार्ड, प्रबुद्ध नगर परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील नवीन सुमठाणा, कटारिया लेआउट, शिवाजीनगर, चंडिका वार्ड, डिफेन्स चांदा परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील शिवाजीनगर भागातून बाधित पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी, परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. नागभीड तालुक्यातील मुसाभाई नगर, किटाळी, बाळापुर, अनुसया नगर, तळोधी, हनुमान मंदिर वलनी, गोवर्धन चौक परिसर,कोथुर्णा, भागातून बाधित पुढे आले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर, पार्डी, माणिक गड कॉलनी परिसर, आंबेडकर भवन परिसर वैशाली नगर भागातून बाधित ठरले आहे. मुल तालुक्यातील नागाळा, चितेगाव, डोंगरगाव, चिंचाळा परिसरातून बाधित ठरले आहे. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर, दादाभाई नौरोजी वार्ड, रेल्वे वार्ड, श्रीराम वार्ड, कोठारी परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

Web Title: The number of new victims increased again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.