सोमवारच्या तुलमेत मंगळवारी रुग्णसंख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:35 AM2021-06-09T04:35:52+5:302021-06-09T04:35:52+5:30
मागील २४ तासात जिल्ह्यात ११८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.तर एका बाधिताचा मृत्यू ...
मागील २४ तासात जिल्ह्यात ११८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.तर एका बाधिताचा मृत्यू झाला.
आज मृत झालेल्यांमध्ये वरोरा तालुक्यातील पांझुर्णी येथील ४६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८३ हजार ७५५ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८० हजार ८२२ झाली आहे. सध्या १ हजार ४४७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४ लाख ९९ हजार १८० नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ४ लाख १२ हजार ५३७ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४८६ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १३७६, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली ३९, यवतमाळ ५१, भंडारा ११, वर्धा एक, गोंदिया तीन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.
बाॅक्स
असे आहे बाधित रुग्ण
चंद्रपूर पालिका क्षेत्र २८,
चंद्रपूर तालुका ०५
बल्लारपूर २१
भद्रावती ०४
ब्रम्हपुरी ०१
नागभिड ०३
सिंदेवाही ०२
मूल ०९
सावली ०
पोंभूर्णा ०५
गोंडपिपरी ०७
राजूरा ०७
चिमूर ०१
वरोरा ०२
कोरपना ११
जिवती००
इतर ००