आठवडी बाजारात मास्क लावणाऱ्यांचे प्रमाण कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:27 AM2021-03-26T04:27:38+5:302021-03-26T04:27:38+5:30
येथील आठवडी बाजारात मास्कचा वापर न करणाऱ्या दुकानदारासोबत ग्राहकदेखील मास्कचा वापर करीत नसल्याने संपूर्ण जिल्यातील आठवडी बाजार रामभरोसे असल्याचे ...
येथील आठवडी बाजारात मास्कचा वापर न करणाऱ्या दुकानदारासोबत ग्राहकदेखील मास्कचा वापर करीत नसल्याने संपूर्ण जिल्यातील आठवडी बाजार रामभरोसे असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असूनसुद्धा गर्दीच्या ठिकाणी, आठवडी बाजार, बस स्टॅन्ड परिसर, किराणा दुकान अशा ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास येत आहे.
आठवडी बाजारात पर जिल्ह्यातून येथील आठवडी बाजारात अनेक विक्रेते येत असून कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती नाकारता येत नाही.
वर्धा जिल्ह्यात लाकडाऊन असताना तेथील विक्रेते हे येथील बाजारपेठेत येत आहेत. आठवडी बाजारात अनेक दुकानदार विनामास्क असून ही स्थिती फार चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे. लवकरात लवकर येथील ग्रामपंचायत कार्यालयाने या बाबीची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.