कोरपनाच्या रस्त्यावरील वाहनांची संख्या रोडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:26 AM2021-04-15T04:26:56+5:302021-04-15T04:26:56+5:30
कोरपना : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिक स्वतःहून बाहेर पडणे टाळत आहेत. यामुळे रस्त्यावरील वर्दळ औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या ...
कोरपना : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिक स्वतःहून बाहेर पडणे टाळत आहेत. यामुळे रस्त्यावरील वर्दळ औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्यात कमी दिसून येत आहे.
कोरपना, गडचांदूर, नांदा फाटा, आवारपूर, कवठाळा, वनसडी, पारडी या तालुक्यातील मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले जात असल्याने त्याला नागरिक योग्य प्रतिसाद देताना दिसत आहे. अत्यावश्यक सेवेची दुकाने सोडल्यास अन्य दुकाने बंद असल्याने सर्वत्र शांतता दिसून येत आहे.
तसेच कोरोना पार्श्वभूमीवर नागरिकही योग्य काळजी घेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडताना दिसत नाही. याचा फायदा संसर्ग रोखण्यासाठी होत आहे. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगचे नियम गावागावात पाळले जात आहेत. नेहमी गजबजलेले चौकही अलीकडे निर्मनुष्य दिसून येत आहेत.
बॉक्स
राज्यमार्गही ओसाड
तालुक्यातील महत्त्वपूर्ण समजले जाणारे कोरपना - आदिलाबाद, गडचांदूर - कोरपना, वनसडी - भोयगाव,
कोरपना - वणी राज्य महामार्ग, गडचांदूर - जिवती, वणोजा - नांदा - गडचांदूर, भोयगाव - गडचांदूर, पारडी - मुकुटबन, जिवती - कोरपना आदी मार्गांवर नियमित चालणाऱ्या वाहनांची संख्या कमी झाली आहे. हे मार्गही ओस पडल्यासारखे दिसत आहेत.