बाधितांची संख्या झपाट्याने घटतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 05:00 AM2020-11-14T05:00:00+5:302020-11-14T05:00:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर :  जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. शुक्रवारी १७५ जणांनी कोरोनावर मात केल्याने ...

The number of victims is rapidly declining | बाधितांची संख्या झपाट्याने घटतेय

बाधितांची संख्या झपाट्याने घटतेय

Next
ठळक मुद्देकोरोना संपला नाही; बाजारात गर्दी करू नका- जिल्हाधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
 जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. शुक्रवारी १७५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आता अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या केवळ दोन हजार ३६७ वर आली आहे. दरम्यान, नागरिकांनी बाजारात गर्दी करू नये. मास्क लावणे, हात धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
शुक्रवारी १०६ जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १७ हजार ४८४ वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १४ हजार ८५० झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख २९ हजार ६०७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख दहा हजार ७०० नमुने निगेटिव्ह आले आहे.
शुक्रवारी चंद्रपूर शहर व परिसरातील जल नगर वार्ड, तुकुम, पायली भटाळी, बाबुपेठ, ऊर्जानगर, घुग्घुस, सिव्हील लाईन परिसर, जटपुरा वार्ड, दुर्गापूर, शक्तिनगर, बालाजी वार्ड, उत्तम नगर, रामनगर, घुटकाळा वार्ड, सरकार नगर, निर्माण नगर, नगिना बाग, स्वावलंबी नगर, बंगाली कॅम्प परिसर, पडोली, समाधी वार्ड भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित
चिमूर तालुक्यातील राजीव गांधी वार्ड, वडाळा भागातून बाधित पुढे आले आहे. मूल तालुक्यातील चक दूगाळा, कन्नमवार वार्ड, वार्ड नंबर ८ परिसरातून बाधित ठरले आहे. सावली तालुक्यातील कापसी भागातून बाधित ठरले आहे. कोरपना तालुक्यातील बिबी, गडचांदूर, वैशाली नगर, वनसडी, कन्हाळगाव, भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. वरोरा तालुक्यातील पाझूंर्णी, अभ्यंकर वार्ड, शांतीनगर, सरदार पटेल वार्ड, मालवीय वार्ड, टेमुर्डा, शेगाव भागातून बाधित पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील कपिल वास्तू नगर, देलनवाडी परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील गुरु नगर, आॅर्डनन्स फॅक्टरी चंदा परिसर, आंबेडकर वार्ड, किल्ला वार्ड, घोडपेठ, भंगाराम वार्ड, विजासन रोड परिसर, पंचशील नगर, सुरक्षा नगर, झाडे प्लॉट परिसर, समता नगर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. राजुरा तालुक्यातील नगर परिषद वॉर्ड, देशपांडे वाडी, आंबेडकर वार्ड, आदर्श चौक परिसर, निंबाळा भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

सात बाधितांचा मृत्यू
शुक्रवारी सात कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. या बाधितामध्ये नागाडा, चिचपल्ली येथील ४० वर्षीय पुरुष, चिचपल्ली येथील ५८ वर्षीय महिला, लालपेठ कॉलनी येथील ५३ वर्षीय पुरुष, पद्मापूर येथील ८१ वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील गोविंदपूर येथील ६५वर्षीय पुरुष, घुगुस येथील ४६ वर्षीय पुरुष, तर गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २६७ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २५० बाधितांचा समावेश आहे.

तालुकानिहाय नवे बाधित
जिल्ह्यात शुक्रवारी पुढे आलेल्या १०६ बाधितांमध्ये ६७ पुरुष व ३९ महिला आहेत. यात चंद्रपूर शहर व परिसरातील ४०, बल्लारपूर तालुक्यातील एक, चिमूर तालुक्यातील एक, मूल तालुक्यातील आठ, गोंडपिपरी तालुक्यातील चार, कोरपना तालुक्यातील आठ, ब्रह्मपुरी तालुक्यातील चार, वरोरा तालुक्यातील आठ, भद्रावती तालुक्यातील २१, सावली तालुक्यातील एक, सिंदेवाही तालुक्यातील चार, राजुरा तालुक्यातील सहा बाधितांचा समावेश आहे. 

Web Title: The number of victims is rapidly declining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.