नूतन धवने महाराष्ट्र रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 11:16 PM2018-05-23T23:16:23+5:302018-05-23T23:16:34+5:30
राज्य शासनाच्या महाराष्ट्र रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना २२ मे २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात आली असून या मंडळाच्या सदस्यपदी चंद्रपूरच्या रंगकर्मी नूतन धवने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ज्येष्ठ रंगकर्मी श्रीपाद जोशी आणि डॉ. जयश्री कापसे गावंडे यांची मंडळाच्या सदस्यपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य शासनाच्या महाराष्ट्र रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना २२ मे २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात आली असून या मंडळाच्या सदस्यपदी चंद्रपूरच्या रंगकर्मी नूतन धवने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ज्येष्ठ रंगकर्मी श्रीपाद जोशी आणि डॉ. जयश्री कापसे गावंडे यांची मंडळाच्या सदस्यपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.
रंगमंचावर सादर होणाऱ्या प्रयोगाच्या संहितांचे पुर्वपरिक्षण करण्यासाठी रंगभुमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे कार्यरत आहे. या मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अरूण नलावडे यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पुढील तीन वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.
मंडळावर नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या सदस्या नूतन धवने या प्रसिध्द नाट्य अभिनेत्री असून शासनाच्या राज्य नाटय स्पर्धेच्या प्राथमिक तसेच अंतिम फेरीमध्ये उत्कृष्ट अभिनयाची सलग सहा रौप्य पदके त्यांनी पटकाविली आहेत. कामगार राज्य नाट्य स्पर्धेतही त्यांनी अनेक पारितोषिके पटकाविली आहे. चंद्रपूरच्या नवोदिता या संस्थेच्या त्या सदस्या आहेत.