स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी घेतली शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 12:08 AM2019-05-04T00:08:22+5:302019-05-04T00:08:44+5:30
विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ कनेक्ट, चांदा शिक्षण प्रसारक मंडळ तसेच अनेक विदर्भवादी संघटनांच्या वतीने जनता महाविद्यालयाच्या समोरील प्रांगणात १ मे रोजी विदर्भ राज्याच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ कनेक्ट, चांदा शिक्षण प्रसारक मंडळ तसेच अनेक विदर्भवादी संघटनांच्या वतीने जनता महाविद्यालयाच्या समोरील प्रांगणात १ मे रोजी विदर्भ राज्याच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
विदर्भवादी नागरिक, संघटनांनी जनता महाविद्यालय समोरील प्रांगणात वेगळ्या विदर्भाच्या मागणीकरिता सकाळी एकत्रित आले. यावेळी उपस्थित विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भासाठी शपथ घेतली. प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी जय विदर्भ, जय जय विदर्भ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी विदर्भ कनेक्टचे संयोजक बंडू धोतरे, विदर्भ राज्य आघाडीचे संयोजक नितीन रामटेके, बंडू धोतरे, नितीन रामटेके, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचीन राजुरकर, इको-प्रो संघटनेचे कार्यकर्ते, जनता महाविद्यालय, जनता शिक्षण महाविद्यालयातील प्राध्यापक सहभागी झाले. यापूर्वी शहरात स्वतंत्र विदर्भासाठी जनमत चाचणी व जाहीर व्याख्याने, १ मे २०१७ रोजी रक्त स्वाक्षरी आंदोलन करण्यात आले होते. ध्वजारोहण समारंभाला विदर्भवादी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
विदर्भवादी नागरिकांसह प्राचार्य डॉ. एम. सुभाष, प्रा.अल्लेवार, प्रा.सोमानी, प्रा.किशोर ठाकरे, प्रा.रवी वरारकर, ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे प्रा. योगेश दुधपचारे, प्रा.महातळे, प्रा. कमलाकर धानोरकर, कुणाल चहारे, भोजराज वानखेडे, अजय बलकी, निळकंठ बल्की, अनिल काळे, घनश्याम येरगुडे तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.