हळदीकुंकू कार्यक्रमात मतदानाचा हक्क बजविण्याची शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 08:44 PM2024-02-11T20:44:00+5:302024-02-11T20:44:12+5:30
ब्रह्मपुरी (चंद्रपूर ): उपविभागीय अधिकारी कार्यालय व नगर परिषद ब्रह्मपुरीच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून महिलांमध्ये मतदार जनजागृतीचे ...
ब्रह्मपुरी (चंद्रपूर ): उपविभागीय अधिकारी कार्यालय व नगर परिषद ब्रह्मपुरीच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून महिलांमध्ये मतदार जनजागृतीचे उद्देशाने राजीव गांधी सभागृहात हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला. नगरसेविका, महिला कर्मचारी व शहरातील अनेक महिलांनी या हळदीकुंकू कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी महिलांनी मतदानाचा हक्क बजावण्याची शपथ घेतली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रिताताई दीपकराव उराडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुख्याधिकारी तथा नोडल अधिकारी अर्शिया जुही यांची उपस्थिती होती. या वेळी नगराध्यक्ष रिताताई उराडे यांच्या हस्ते महिलांना सौभाग्याचे हळदीकुंकू व वाण देण्यात आले. या वेळी मार्गदर्शन करताना मुख्याधिकारी अर्शिया जुही यांनी येणाऱ्या निवडणुकीत सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावण्याचे महिलांना आवाहन केले. तसेच आगामी लोकसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संबंधाने निवडणूक कार्यक्रमातील निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे व पारदर्शक पार पाडण्याच्या उद्देशाने मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाला नगरसेविका अंजली उरकुडे, नगरसेविका सरिता पारधी, नगरसेविका रुपाली रावेकर, नगरसेविका अर्चना खंडाते, नगरसेविका सपना खेत्रे, नगरसेविका पुष्पा गराडे, नगरसेविका नीलिमा सावरकर आदींची उपस्थिती होती.