राज्य सरकारसाठी ओबीसींनी मागितली भीक, शिष्यवृत्तीसाठी निधीची तरतूद न केल्याने संताप

By राजेश मडावी | Published: September 21, 2023 03:40 PM2023-09-21T15:40:27+5:302023-09-21T15:41:21+5:30

भिकेत मिळालेली रक्कम शासनाकडे मनीऑर्डरने रवाना करण्यात आली

OBCs beg for state government, angry over non-provision of funds for scholarships | राज्य सरकारसाठी ओबीसींनी मागितली भीक, शिष्यवृत्तीसाठी निधीची तरतूद न केल्याने संताप

राज्य सरकारसाठी ओबीसींनी मागितली भीक, शिष्यवृत्तीसाठी निधीची तरतूद न केल्याने संताप

googlenewsNext

चंद्रपूर : ओबीसी, व्हीजे-एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ ओबीसी वसतिगृह, आधार योजना, विदेश शिष्यवृत्तीसाठी राज्य सरकारने आर्थिक तरतूद केली नाही, असा आरोप करून ओबीसी कार्यकर्त्यांनी ओबीसी सेवा संघातर्फे गुरुवारी गांधी चौकात भीक मांगो सत्याग्रह केला. भिकेत मिळालेली रक्कम शासनाकडे मनीऑर्डरने रवाना करण्यात आली.

मागील सहा वर्षांपासून ओबीसी विद्यार्थ्यांच्या ७२ वसतिगृहांचा विषय शासनाने सोडवला नाही. यामुळे ओबीसी विद्यार्थी वसतिगृहे व आधार योजनेपासून वंचित आहेत. वसतिगृह सुरू होतील या आशेने जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवेश घेतला आहे. मात्र अजूनही वसतिगृह सुरू झालेली नाहीत. विद्यार्थ्यांना मिळेल ते काम करून शिक्षण घ्यावे लागत आहे. अनेक विद्यार्थी गरिबीमुळे खचून गेले. शाळा-महाविद्यालये सुरू होऊन तीन महिने झाले. ७ हजार २०० विद्यार्थ्यांसाठी ७२ ओबीसी वसतिगृहे, २१ हजार ६०० विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले आधार योजना, ७५ विद्यार्थ्यांसाठी विदेश शिष्यवृत्ती योजना यावर निर्णय झालेला असताना शासनाने सुरू केल्या नाहीत.

शासनाकडे ओबीसी विद्यार्थ्यांच्या हितासाठी निधी नाही, असा आरोप करून शासनाचा निषेध करण्यासाठी भीक मांगो सत्याग्रह करण्यात आला. आंदोलनात ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल डहाके, जिल्हा महासचिव ॲड. विलास माथनकर, भाविक येरगुडे, प्रलय म्हशाखेत्री, अक्षय येरगुडे, गोमती पाचभाई, भूषण फुसे, गीतेश शेंडे सहभागी झाले होते.

Web Title: OBCs beg for state government, angry over non-provision of funds for scholarships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.