ऑल इंडिया मेडिकल कोट्यात ओबीसींना मिळणार २७ टक्के आरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:29 AM2021-07-28T04:29:44+5:302021-07-28T04:29:44+5:30
पंतप्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री आणि एसजेई यांना वैद्यकीय प्रवेशामध्ये ऑल इंडिया कोट्याच्या जागांवर ओबीसी आरक्षण देण्यास अंतिम करण्याचे ...
पंतप्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री आणि एसजेई यांना वैद्यकीय प्रवेशामध्ये ऑल इंडिया कोट्याच्या जागांवर ओबीसी आरक्षण देण्यास अंतिम करण्याचे निर्देश आज (दि. २७ ) ला दिले आहेत. राज्याला युजीमध्ये १५ टक्के कोट्यात व पीजीमध्ये ५० टक्के कोट्यात २७ टक्के ओबीसींना आरक्षण मिळणार आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने २०१७ पासून ऑल इंडिया मेडिकल कोट्यामध्ये सातत्याने २७ टक्के आरक्षण मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. अनेकदा राष्ट्रीय ओबीसी महासंघाने तालुका, जिल्हा स्तरापासून नवी दिल्ली जंतरमंतरवर धरणे, आंदोलने, निदर्शने, मंत्री व खासदार यांच्या घरासमोर निदर्शने केली. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात २०१८ मध्ये याचिका दाखल केली. यासाठी केंद्रीय मागासवर्गीय आयोग नवी दिल्ली येथे कार्यालयासमोर निदर्शने केली. २६ जुलै २०२१ रोजी आंध्र भवन नवी दिल्ली येथे राष्ट्रीय कार्यकारिणीत ठराव घेऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. महासंघाचे व देशभरातील अनेक ओबीसी संघटनेचे हे यश असून आता २७ टक्के आरक्षण ऑल इंडिया मेडिकल कोट्यात यावर्षीपासून लागू होईल. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, सचिन राजुरकर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.