ओबीसींचा राष्ट्रीय पातळीवर लढा आवश्यक!
By admin | Published: April 13, 2017 12:47 AM2017-04-13T00:47:15+5:302017-04-13T00:47:15+5:30
नवी दिल्ली येथे विविध राज्यातील ओबीसी नेते, संघटनांचे पदाधिकारी, युवक विद्यार्थी आदींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
खुशाल बोपचे : ओबीसींच्या प्रश्नावर बैठक; विविध विषयांवर चर्चा
चंद्रपूर: नवी दिल्ली येथे विविध राज्यातील ओबीसी नेते, संघटनांचे पदाधिकारी, युवक विद्यार्थी आदींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
खा. शरद याव, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय समन्वयक माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे निमंत्रक सचिन राजुरकर, प्रसिद्धी प्रमुख खेमेंद्र कटरे, सत्यशोधक समाजाचे सुनील सरदार, ओबीसी नेते प्रा. श्रावण देवरे, प्रा. दिलीप मंडटल, उत्तरप्रदेशाच्या यादव, अॅड. उमा ाजयस्वाल, जेएनयूच्या प्राची पटेल, बिहारहून राजेश कुमार, दिल्लीचे जुगेश करोटीया, अॅड. अमित सिंग, ईदी दुनियाचे सुनील जैन, अॅड. एम. आय. प्रेमी, ग्वाल्हेरचे विजय याज्ञिक, धर्मेद्र कुशवाह, दिल्लीच्या सरिता सागर, अॅड. जय ठाकूर, जेएनयुचे दिलीप यादव, मुलायम यादव, प्रा. महेंद्र यादव, अॅड. अमित सिंग, अॅड. दीपक जाखड, राजेंद्र आदी विविध राज्यातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. बोपचे म्हणाले, आज ओबीसीच्या समस्येची जाण असलेला प्रत्येक जण ओबीसीच्या मागासपणाची कारणे जाणतो आहे. तो अन्यायाविरुद्धसुद्धा लढत आहे. पण आपण जोपर्यंत राष्ट्रीय स्तरावर एकत्र लढा देत नाही, तोपर्यंत आपल्या लढ्याला यश देणे दुरापास्त आहे. त्यासाठी जातीचे समीकरण तोडून ओबीसी या एका प्रवर्गाच्या बॅनरखाली येणे गरजेचे आहे. येत्या ७ आॅगस्ट २०१७ रोजी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या द्वितीय महाधिवेशाला आपण सर्वानी मोठ्या संख्येने हजेरी लावावी. त्याचे जाहीर आमंत्रण राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे निमंत्रक सचिन राजुरकर यांनी आजच दिले असल्याचेही म्हणाले. खासदार शरद यादव यांनी मंडल आयोगाच्या काळापासून आजपर्यंत ज्या काही संघटना ओबीसींना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी काम करीत आहेत, त्या सर्वामुळेच आज ओबीसी काही प्रमाणात जागृत झालेला आहे. परंतु सध्याची राजकीय परिस्थिती बघता ओबीसींवर अन्यायात्मक धोरणे राबविण्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.