ओबीसींनी अधिकारासाठी सज्ज व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 12:34 AM2018-06-08T00:34:57+5:302018-06-08T00:34:57+5:30
जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न हा मोठा गंभीर स्वरूपाचा आहे़ त्यामुळे वंचित समाजातील विद्यार्थी व नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात घेत असताना अडचणी वाढल्या़ त्याकरीता हा प्रश्न लवकरच निकाली काढण्याकरिता प्रयत्न करीत आहोत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न हा मोठा गंभीर स्वरूपाचा आहे़ त्यामुळे वंचित समाजातील विद्यार्थी व नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात घेत असताना अडचणी वाढल्या़ त्याकरीता हा प्रश्न लवकरच निकाली काढण्याकरिता प्रयत्न करीत आहोत. ओबीसींना आरक्षण व संविधानिक अधिकार मिळविण्यास आता सज्ज झाले पाहिजे, असे मत सामाजिक चळवळींचे अभ्यासक व आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष विजय मानकर यांनी व्यक्त केले़
स्थानिक आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या जनसभा व मुलनिवासी आदिवासी संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी प्रा. संजय पिठाडे, शोभा भोयर, अर्जुन कारमेंगे, डॉ. भगवान कारमेंगे, प्रा. नंदकिशोर रंगारी, अॅड. त्रिशिल खोब्रागडे, राजु वाघमारे, प्रा. आर. एम. पाटील उपस्थित होते.
माजी आमदार वरखेडे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात ५ वी अनुसूची, पेसा कायदा १९६५ व वनहक्क अधिनियम यावर सुरू असलेल्या कार्याची मांडणी केली़ प्रा. डॉ. नन्नावरे, भोयर, प्रा. पिठाडे यांनीही बहुजन समाजाच्या विविध प्रश्नांवर मार्गदर्शन केले़
संचालन डी. एम. नन्नावरे यांनी केले. आभार मोहन दोडके यांनी मानले. यावेळी प्रा. अनिल दडमल, प्रा. ज्ञानेश्वर जांभुळे, नथ्थू मानकर, धनंजय दडमल, आशिष नगराळे, पाटील, विद्या गणवीर, भारती दोडके, नागदेवते व तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.