ओबीसींनी सामाजिक समतेचा लढा उभारावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:52 AM2017-11-01T00:52:45+5:302017-11-01T00:53:30+5:30

ओबीसी शेतकºयांच्या व शिक्षित तरुणांच्या अधोगतीसाठी सरकारचे शेटजी-भटजी जगवा व शेतकरी आणि ओबीसींना मारा हे धोरणच कारणीभूत आहे.

OBCs should create a fight for social equality | ओबीसींनी सामाजिक समतेचा लढा उभारावा

ओबीसींनी सामाजिक समतेचा लढा उभारावा

Next
ठळक मुद्देसरकारचे शेटजी-भटजी जगवा व शेतकरी आणि ओबीसींना मारा हे धोरणच कारणीभूत आहे

बळीराज धोटे : स्वयंसन्मान चळवळ
चंद्रपूर: ओबीसी शेतकºयांच्या व शिक्षित तरुणांच्या अधोगतीसाठी सरकारचे शेटजी-भटजी जगवा व शेतकरी आणि ओबीसींना मारा हे धोरणच कारणीभूत आहे. राज्यघटनेने ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले पाहिजे, असे स्पष्ट सांगितले आहे. मात्र सर्वोच्च न्यायालय ५० टक्केच्यावर आरक्षण देता येत नाही असे म्हणून १५ टक्के उच्च वर्णीयांसाठी ५० टक्के सरकारी नोकºया आरक्षीत करीत आहे, ओबीसींनी आपल्या घटनात्मक हक्क अधिकार समजून घ्यावे, व लोकप्रतिनिधींना जेरीस आणावे, असे आवाहन सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटचे मुख्य संघटक बळीराज धोटे यांनी पिपरी (धानोरा) येथील ओबीसी जागृती सभेमध्ये केले.
स्थानिक तरुणांच्या पुढाकाराने पिपरी येथे नुकतीच ओबीसी जागरण सभा हनुमान मंदिरासमोरील पटांगणावर घेण्यात आली. सभेला बळीराज धोटे, ल. वि. घागी, संदीप पिंपळकर, प्रकाश पिंपळकर आदींनी मार्गदर्शन केले. सभेच्या आयोजनासाठी संदीप पिंपळकर, राजेश पिंपळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: OBCs should create a fight for social equality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.