अभियंत्याकडून घरकुल लाभार्थ्यांची अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:19 AM2021-06-27T04:19:08+5:302021-06-27T04:19:08+5:30

वढोली : गोंडपिपरी पंचायत समितीत कार्यरत घरकुल विभागाचे अभियंता चव्हाण यांची कार्यपद्धती गरीब घरकुल लाभार्थ्यांच्या हिताची नसून, अनेक लाभार्थ्यांची ...

Obstruction of Gharkul Beneficiaries by Engineer | अभियंत्याकडून घरकुल लाभार्थ्यांची अडवणूक

अभियंत्याकडून घरकुल लाभार्थ्यांची अडवणूक

googlenewsNext

वढोली : गोंडपिपरी पंचायत समितीत कार्यरत घरकुल विभागाचे अभियंता चव्हाण यांची कार्यपद्धती गरीब घरकुल लाभार्थ्यांच्या हिताची नसून, अनेक लाभार्थ्यांची अडवणूक करण्याचे काम सुरू असून, त्यांच्याकडील कार्यभार काढण्यात यावा, अशी मागणी करीत या संदर्भातील तक्रार अनुसूचित जाती विभाग काँग्रेसने गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.

घरकुल लाभार्थी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर एक दोन कागदपत्र गहाळ करून तीच कागदपत्रे अर्थकारणासाठी चव्हाण वारंवार मागतात. सोबतच एक दोन चकरा मारल्यानंतर त्रुटी असून, पुन्हा काम थांबवून ठेवतात. पंतप्रधान आवास, शबरी, रमाई घरकुल योजना या तिन्ही लाभार्थ्यांचे बिल काढण्यासाठी अभियंता चव्हाण आर्थिक शोषण करीत असून, त्यांच्याकडील कार्यभार काढण्यात यावा, अशी मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीतून केली आहे. यावेळी अनुसूचित जाती विभाग तालुका अध्यक्ष गौतम झाडे, कमलेश निमगडे, तुकाराम झाडे, राजीवसिंह चंदेल, सचिन फुलझले, वनिता वाघाडे, महेश सोनकुलवार, नामदेव सांगळे, बालाजी चनकापुरे, नवराज चंद्रगडे, अभय शेंडे, रेखा रामटेके उपस्थित होते.

कोट

याबाबतची तक्रार प्राप्त झाली असून, त्यासंदर्भात घरकुल लाभार्थ्यांची चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यात येईल.

- शेषराव भुलकुंडे, गटविकास अधिकारी गोंडपिपरी.

Web Title: Obstruction of Gharkul Beneficiaries by Engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.