१ ऑक्टोबरपासून ताडोबा पर्यटकांसाठी खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:34 PM2019-09-30T12:34:05+5:302019-09-30T12:35:25+5:30

दोन महिन्यांपासून ताडोबा येथील बंद असलेले सर्व गेट १ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. त्यामुळे आता पर्यटकांना बफर क्षेत्रासह कोअर झोनमध्येही व्याघ्र दर्शन करता येणार असल्याने पर्यटकांमध्ये आनंद निर्माण झाला आहे.

From October 1, Tadoba is open to tourists | १ ऑक्टोबरपासून ताडोबा पर्यटकांसाठी खुले

१ ऑक्टोबरपासून ताडोबा पर्यटकांसाठी खुले

googlenewsNext
ठळक मुद्देकोअरचे गेट उघडणार पर्यटकांना व्याघ्रदर्शन करणे सोईचे

 लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील दोन महिन्यांपासून ताडोबा येथील बंद असलेले सर्व गेट १ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. त्यामुळे आता पर्यटकांना बफर क्षेत्रासह कोअर झोनमध्येही व्याघ्र दर्शन करता येणार असल्याने पर्यटकांमध्ये आनंद निर्माण झाला आहे.
हमखास व्याघ्रदर्शन म्हणून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प देशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे या प्रकल्पात इतर देशातील पर्यटकही मोठ्या प्रमाणात येतात. मात्र जंगलातील कच्चा रस्त्यामुळे पर्यटनात अडथळा निर्माण होत असल्यामुळे मागील दोन वर्षांपासून पावसाळ्यात १ जुलैपासून ताडोबा कोअर झोन पूर्णपणे बंद ठेवण्यात येतो. केवळ बफरचे सात दरवाजे सुरु असतात. यातही पर्यटकांची मोठी भीड असते. मात्र आता १ ऑक्टोबरपासून कोअर झोनचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे आता ताडोबाचे संपूर्ण दरवाजे सुरु होणार आहेत. त्यामुळे पर्यटकांना व्याघ्र दर्शन करणे सहज शक्य होणार आहे.

१५ ऑक्टोबरपासून कँटरने सफारी
यावर्षी झालेल्या संततधार पावसामुळे प्रकल्पातील बहुतेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्याच्या डांगडुजीचे काम सुरु आहे. परिणामी १ ऑक्टोबरपासून जिप्सीने पर्यटन करताना येणार आहे. परंतु, कँटरने सफारी बंद राहणार आहे. १५ ऑक्टोबरपासून कँटरची सफारी सुरु होणार असल्याचे संकेत आहे.

Web Title: From October 1, Tadoba is open to tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.