घुग्घुसचे नायब तहसीलदार कार्यालय वाºयावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 11:34 PM2017-08-24T23:34:29+5:302017-08-24T23:34:51+5:30
येथील कार्यालयात कायमस्वरूपी नायब तहसीलदार, लिपिकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. येथे केवळ एक शिपाई कार्यरत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : येथील कार्यालयात कायमस्वरूपी नायब तहसीलदार, लिपिकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. येथे केवळ एक शिपाई कार्यरत आहे. कार्यालय सुरू होण्याची वेळ नसल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. बुधवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते सव्वाबारा वाजता निवेदन देण्याकरिता गेले असता कार्यालय कुलूपबंद पाहून संताप व्यक्त केला.
महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची निवड झाली. सभेदरम्यान झालेल्या प्रकाराची तक्रार देण्यासाठी भाजप व्यतिरिक्त सर्व पक्षांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने नायब तहसीलदार कार्यालयात पोहोचले होते. मात्र कार्यालय कुलूप बंद होते.
बºयाच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर नायब तहसीलदार, शिपाई कार्यालयात पोहोचले व कुलुप उघडले. त्यानंतर चर्चा करून घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली.
नायब तहसीलदार कार्यालयाला कायमस्वरूपी नायब तहसीलदार आणि लिपिक नसल्याने कार्यालय उघडण्याची वेळ नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना कार्यालयीन कामकाजा करीता आल्यानंतर तासन्तास कार्यालय उघडण्याची प्रतीक्षा करावी लागते. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे.