अधिकाऱ्यांनी कर्तव्याचे पालक करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:30 AM2019-03-31T00:30:59+5:302019-03-31T00:31:28+5:30
चंद्र्रपूर लोकसभा निवडणूक पारदर्शी व्हावी, याकरिता संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्याचे पालन करावे, अशा सुचना निरीक्षक दीपांकर सिन्हा यांनी दिल्या. मतदार संघातील लोकसभा निवडणूकीसाठी निरीक्षक म्हणून दाखल झाल्यानंतर यंत्रणेचा आढावा घेताना शुक्रवारी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्र्रपूर लोकसभा निवडणूक पारदर्शी व्हावी, याकरिता संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्याचे पालन करावे, अशा सुचना निरीक्षक दीपांकर सिन्हा यांनी दिल्या. मतदार संघातील लोकसभा निवडणूकीसाठी निरीक्षक म्हणून दाखल झाल्यानंतर यंत्रणेचा आढावा घेताना शुक्रवारी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कलमी सभागृहातील बैठकीप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, राजुरा उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, आर्णी येथील उपविभागीय अधिकारी एस. भुनेश्वरी, जिल्हा उपनिवडणूक अधिकारी संपत खलाटे व सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून दीपांकर सिन्हा यांची नियुक्ती केली आहे. लोकसभा निवडणुकीसंदर्भात निवडणूक निरीक्षक सिन्हा यांना तक्रारी अथवा निवेदन देण्यासाठी प्रशासनाने दुपारी ४. ३० ते सायंकाळी ६ वाजता ही वेळ ठरवून देण्यात आली आहे.
निरीक्षक सिन्हा यांनी शुक्रवारी सर्व अधिकाऱ्यांची ओळख करून घेतली. शिवाय, त्यांच्याकडे देण्यात आलेल्या निवडणूक कामाचा आढावा घेतला. राजकीय पक्षांच्या उमेदवारांसोबत पक्षचिन्ह वाटपाच्या बैठकीला उपस्थित राहून त्यांच्याशी संवाद साधला.
आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उत्तम तयारी केली. त्यामुळे निवडणूक लढविणाºया उमेदवारांनी कोणत्याही परिस्थितीत आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही सिन्हा यांनी यावेळी नमूद केले.