तेलवासा कोळसा खाण बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 11:38 PM2017-11-30T23:38:56+5:302017-11-30T23:39:06+5:30

वेकोलि माजरीच्या तेलवासा खुल्या कोळसा खाणीत २४ नोव्हेंबरच्या रात्री ११.३० वाजता कोळसाचा ढिगारा कोसळल्याने डोजर आॅपरेटर निरजू झा याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेला आज सात दिवस होऊनही कोणत्याच अधिकाºयावर कारवाई झालेली नाही.

Oilseed coal mines closed | तेलवासा कोळसा खाण बंद

तेलवासा कोळसा खाण बंद

googlenewsNext
ठळक मुद्देकामगार मृत्यूप्रकरण : बेंचेसअभावी खाण झाली होती विहिरीसारखी

राजेश रेवते।
लोकमत न्यूज नेटवर्क
माजरी : वेकोलि माजरीच्या तेलवासा खुल्या कोळसा खाणीत २४ नोव्हेंबरच्या रात्री ११.३० वाजता कोळसाचा ढिगारा कोसळल्याने डोजर आॅपरेटर निरजू झा याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेला आज सात दिवस होऊनही कोणत्याच अधिकाºयावर कारवाई झालेली नाही. यासंदर्भात वेकोलिचे वरिष्ठ अधिकारी चौकशी सुरू असल्याचे सांगत आहेत. दुसरीकडे तेलवासा खाणीला बंद करण्यात आले आहे.
तेलवासा कोळसा खाणीत कोळसा काढण्यासाठी सायंकाळी ७ वाजता ब्लास्टिंग करण्यात आली. वास्तविक, ब्लास्टिंगचे काम अंधारात न करता दुपारीच केले जाणे बंधनकारक आहे. मात्र ब्लास्टिंग अधिकारी, सुरक्षा अधिकारी व उपक्षेत्रीय प्रबंधक यांनी नियमबाह्यरित्या सायंकाळी ७ वाजता ब्लास्टिंग केली. अंधारात ब्लास्टिंग केल्यामुळे तिथे कोळसा पूर्णपणे खाली कोसळला की नाही, याची शाहनिशा करणे कठीण असते. घटनेच्या दिवसीही याबाबत शहानिशा झाली नव्हती, असे चौकशीत निष्पन्न झाले आहे. डोजर आॅपरेटर निरज झा जे डोजर मशीन चालवत होते, ते मशीन कालबाह्य झालेली होती, अशी माहिती आहे.
विशेष म्हणजे, तेलवासा कोळसा खदान हे सध्या विहिरीसारखी खोल आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तिथे बेंच बनवायला हवे होते. ज्यामुळे खाली काम करीत असताना वरून माती कोसळत नाही. मात्र या ठिकाणी बेंचेस बनविण्यात आलेले नाही.
कोल इंडियाचे डायरेक्टर आॅफ जनरल (सुरक्षा), डायरेक्टर आॅफ टेक्नीकल आणि वेकोलि माजरीचे संपूर्ण अधिकारी यांना ही खाण कोळसा काढण्यासाठी सुरक्षित नाही, हे चांगले ठाऊक होते. तरीही या खाणीत कोळसा काढणे सुरुच ठेवण्यात आले होते. या तेलवासा खाणीला मागेच बंद केले असते, तर यात कामगार निरजू झा याचा जीव गेला नसता.
डायरेक्टर आॅफ जनरल (सुरक्षा) अशोककुमार व डायरेक्टर आॅफ टेक्निकल लक्ष्मी नारायण यांनी आपल्या दौºयात अनेकदा या खाणीची पाहणी केली होती. तरीही खाण सुरूच होती. आता कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याची चौकशीदेखील हेच अधिकारी करीत आहे. त्यामुळे एखाद्या अधिकाºयावर निलंबनाची कार्यवाही करून प्रकरण दडपले जाण्याची शक्यताही अधिक आहे. असे झाले तर घटनेला जबाबदार मुख्य अधिकारी अभय मिळेल.
वेकोलि माजरी कामगारांच्या पाच कामगार संघटना असून या पाचही कामगार संघटनेचे नेता खाण सुरक्षा समितीमध्ये सदस्य आहेत. घटनेनंतर सुरक्षा समितीचे सदस्य माजरीच्या तेलवासा खाणीत येऊन पाहणी करून जात आहे. परंतु खाणीत बेंचेस का नाही, याबाबत कुणीही आक्षेप घेतलेला नाही, हे विशेष. पाचही कामगार संघटना चुप्पी साधून असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला जात आहे.
 

Web Title: Oilseed coal mines closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.