खरबी येथे साकारले वृद्धाश्रम
By admin | Published: January 28, 2017 01:02 AM2017-01-28T01:02:37+5:302017-01-28T01:02:37+5:30
येथून ३ कि.मी. अंतरावर असलेल्या खरबी (माहेर) येथे नवनियुक्त पोलीस पाटील प्रतिभा धोंगडे यांच्या पुढाकारातून वृद्धाश्रम सुरू झाले आहे.
१५ वृद्ध स्त्री-पुरुषांचा समावेश : पोलीस पाटलांचा उपक्रम
ब्रह्मपुरी : येथून ३ कि.मी. अंतरावर असलेल्या खरबी (माहेर) येथे नवनियुक्त पोलीस पाटील प्रतिभा धोंगडे यांच्या पुढाकारातून वृद्धाश्रम सुरू झाले आहे. या वृद्धाश्रमाचे मंगळवारी रीतसर उद्घाटन करण्यात आले.
प्रत्येक पुरुष अथवा स्त्री ५५ ते ६० वर्षानंतर म्हातारपणाच्या अवस्थेत जगतात. या अवस्थेत त्यांना कित्येक मुले व सुना आपल्या सासु सासऱ्यांना सेवा देत नाही. त्यामुळे त्यांचे जीवन असह्य होत असते. अशावेळेस वृद्ध आत्महत्या किंवा आजारामुळे आपली जीवनयात्रा संपवित असतात. अशांना धिर देण्याचा धाडस एका छोट्या गावात पोलीस पाटलांनी घडवून आणला आहे.
ब्रह्मपुरीच्या आजुबाजूच्या गावांमध्ये अशा प्रकारची सोय नव्हती. ती उणीव या उपक्रमाने भरून निघाली आहे. आज या वृद्धाश्रमात १५ वृद्ध स्त्री-पुरुष वास्तव्य करीत आहेत. या वृद्धाश्रमाचे परिसरात कौतूक केले जात असून संत गाडगेबाबा वृद्धाश्रम म्हणून त्याचे नामकरण करण्यात आले आहे.
उद्घाटनाप्रसंगी ज्या वृद्धांना आधार नसेल त्यांनी नि:संकोच प्रवेश घेण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अर्चना टेंभरे, संत गाडगेबाबा वृद्धाश्रमाच्या अध्यक्ष दुर्गा गायकवाड, पोलीस पाटील प्रतिभा धोंगडे, गावातील नागरिक व वृद्धाश्रमातील आश्रय घेणारे पुरूष व स्त्री मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)