मुक्कामाला येणारी बस आगारातच थांबली; प्रवाशांची गैरसोय वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:10 AM2021-08-02T04:10:23+5:302021-08-02T04:10:23+5:30
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर महामंडळाने बससेवा सुरू केली; परंतु अद्यापही ५० टक्के एसटी गाड्या आगारातच थांबून आहेत. अद्यापही शाळा ...
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर महामंडळाने बससेवा सुरू केली; परंतु अद्यापही ५० टक्के एसटी गाड्या आगारातच थांबून आहेत. अद्यापही शाळा सुरू झाल्या नाहीत. पाऊस, खराब रस्ते व ग्रामीण भागात प्रवाशांचा कमी असणारा प्रतिसाद यामुळे बहुतांश एसटी मुक्कामी जाणे बंद झाले आहे. त्यामुळे सकाळच्या सुमारास ग्रामीण भागातून होणाऱ्या बसफेऱ्या बंद आहेत. त्यामुळे सकाळी प्रवास करणाऱ्यांची गैरसोय होत आहे.
बॉक्स
५० टक्के बस आगारातच
चंद्रपूर जिल्ह्यातील चार आगारांतील वाहतूक सुरू आहे. मात्र, जवळपास ५० टक्के गाड्या आगारातच उभ्या आहेत.
प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने गाडी तोट्यात सोडण्यापेक्षा आगारात थांबून ठेवणे ही एसटीची भूमिका आहे.
त्यामुळे गाड्यांच्या फेऱ्या कमी करणे, मुक्कामी गाड्या बंद करणे आदी कारणांमुळे बस आगारातच उभ्या आहेत.
बॉक्स
रुग्ण घटले; एसटी कधी धावणार
कोरोना रुग्णांची संख्या सतत कमी होत आहे. यामुळे आगारांनी सर्व बस सुरू करायला हव्यात. ग्रामीण भागात बसची अद्यापही प्रतीक्षा आहे. तालुक्याच्या गावी जाण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक बसचा वापर करतात. मात्र, बसअभावी त्यांना अडचण येत आहे.
-अजित गेडाम, प्रवासी
-----
शेतीचे साहित्य खरेदी करण्यासाठी तालुका मुख्यालयी यावे लागते. मात्र, बसफेऱ्या कमी असल्याने खासगी वाहनांचा वापर करावा लागतो. त्यामुळे अतिरिक्त पैसे द्यावे लागत आहेत. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने आता बसफेऱ्या नियमित सुरू करण्यात याव्यात.
प्रशांत खोब्रागडे, प्रवासी
----
६८ मुक्कामी बसपैकी ३८ सुरू
कोरोनापूर्वी चारही आगारांतून ६८ बस मुक्कामी जात होत्या. आता प्रवासी वाहतूक सुरळीत झाली असूनही केवळ ३८ बसच धावत आहेत. त्यामुळे अनेक ग्रामीण भागात सकाळच्या सुमारास बसफेऱ्या धावत नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठी पंचायत होत आहे.