वरोऱ्यात साकारणार दीड कोटींचे उद्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 10:30 PM2018-11-21T22:30:27+5:302018-11-21T22:30:41+5:30
शहरातील यात्रा रोड व वणी बायपासलगत वनविभागाची २५ एकर जागा असून या जागेत वनविभाग दीड कोटी रूपये खर्च करून सर्व सोईयुक्त उद्यान उभारणार आहे. उद्यानाचा प्रस्ताव वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाने वरिष्ठांकडे नुकताच सादर केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : शहरातील यात्रा रोड व वणी बायपासलगत वनविभागाची २५ एकर जागा असून या जागेत वनविभाग दीड कोटी रूपये खर्च करून सर्व सोईयुक्त उद्यान उभारणार आहे. उद्यानाचा प्रस्ताव वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाने वरिष्ठांकडे नुकताच सादर केला आहे.
वरोरा शहरातील सर्व्हे क्रमांक ४८३, ४४८ ही २५ एकर जागा आहे. या जागेलगत वरोरा शहरातील मध्यभागी असलेला तलाव आहे. वनविभागाच्या या जागेवर मागील काही दिवसांपासून अतिक्रमण करणे सुरू केले होते. वनविभागाने नुकतेच अतिक्रमण काढले असून या जागेवर दीड कोटी रूपये खर्च करून उद्यान उभारले जाणार आहे. उद्यानामध्ये विविध प्रकारची फळझाडे लावण्यात येणार असून बोअरवेल, वॉटर टँक व परिसरातील मंदिरालगत सौरऊर्जेचे दिवे लावण्यात येणार आहे. उद्यानाचे आकर्षक प्रवेशद्वार, उद्यानाच्या सभोवताल चेनलीक फेन्सींग, तीन मनोरे, बसण्याकरिता जागा, निसर्ग पायवाट, आकाश झुला, ट्री हाऊसेस गार्डरूम, वाहनतळ, विद्युत दिवे, शुद्ध पिण्याचे पाणी, वॉटर बोट आदी सोई असणार आहे. हे उद्यान तयार झाल्यानंतर देखभाल व दुरूस्तीकरिता वरोरा पालिकेला हस्तांतरित करण्यात येणार आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी के. आर. आक्केवार यांनी दिली.