दोन लाख महिलांच्या खात्यात जमा होणार दीडहजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 05:00 AM2020-05-09T05:00:00+5:302020-05-09T05:00:32+5:30
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर आर्थिकदृष्ट्या कमजोर घटकांमध्ये प्रचंड नाराजी पुढे आली. परिणामी, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत जनधन बचत खाते असलेल्या महिलांच्या बचत खात्यात एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रतिमहा प्रत्येकी ५०० रूपये सानुग्रह अनुदान जमा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाच्या प्रतिकारासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू असल्याने केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत महिलांच्या जन-धन बचत खात्यात एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रत्येकी प्रतिमहा ५०० रूपये सानुग्रह अनुदान जमा करण्याची प्रक्रिया २ एप्रिलपासून सुरू केली होती. एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील २ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी ५०० रूपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे.
जिल्ह्यात जन-धन योजनेचे ५ लाख २६ हजार ६९८ बचत खाते असून यामध्ये महिलांचे २ लाख ६० हजार ४७३ खाते आहेत. महिलांच्या जनधन बचत खात्यात प्रतिमहा ५०० रूपये प्रमाणे तीन महिन्याच्या कालावधीत एकून दीड हजारांचे सानुग्रह अनुदान जमा केल्या जाणार आहे.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर आर्थिकदृष्ट्या कमजोर घटकांमध्ये प्रचंड नाराजी पुढे आली. परिणामी, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत जनधन बचत खाते असलेल्या महिलांच्या बचत खात्यात एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रतिमहा प्रत्येकी ५०० रूपये सानुग्रह अनुदान जमा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला.
त्यानुसार महिलांच्या जन-धन बचत खात्यात ५०० रूपये अनुदानाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया बँकांमार्फत २ एप्रिलपासून सुरू केली. जिल्ह्यातील सुमारे दोन लाख महिलांच्या बचत खात्यात एप्रिल महिन्यातील ५०० रूपयांचे अनुदान जमा झाले आहे.
जन-धन खाते पुन्हा वाढणार?
जन-धन खाते पुन्हा वाढणार जिल्ह्यातील जन-धन योजनेच्या ५ लाख २६ हजार ६९८ पैकी २ लाख ६० हजार ४७३ खाते महिलांचे आहेत. तीन महिन्याच्या कालावधीत मिळणाऱ्या दीडहजारांपैकी एप्रिल महिन्यातील ५०० रूपयांचे पहिले अनुदान जमा झाल्याचे पाहून हजारो महिलांनी नवीन खात्यासाठी राष्ट्रीय बँकांच्या सर्व्हीस सेंटरमध्ये कागदपत्रे सादर केल्याचे चंद्रपूर शहरात दिसून आले. त्यामुळे जन-धन बँक खात्यांची संख्या वाढू शकते,अशी माहिती संचालकांनी दिली.
तुटपुंजी मदत लगेच ‘विड्राल’
आर्थिक ताकद अत्यल्प असलेल्या कुटुंबांनाच कोरोना लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसत आहे. रोजगाराचे सर्व मार्ग बंद झाल्याने अशा कुटुंबांचे हाल सुरू आहेत. जन-धन बँक खात्यात ५०० रूपयांचे अनुदान जमा झाल्यानंतर ९ एप्रिलनंतर केव्हाही बँकेतून पैसे काढण्याच्या बँकेच्या सूचना होत्या. त्यामुळे कोरोना विषाणूच्या दहशतीची पर्वा न करता चहूबाजुने कोंडीत सापडलेल्या महिलांनी १० एप्रिलपासूनच बँकांसमोर रांगा लावल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळाले होते..
जिल्ह्यात दोन लाख ६० हजार ४७३ महिलांचे जन-धन खाते आहेत. काही महिलांचे दोन खातेही आहेत. त्यामुळे आधार लिंक असणाºया एकाच खात्यात डीबीटीद्वारे रक्कम वर्ग करण्यात आली. या संदर्भातील माहिती संकलीत केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असतानाही बँकांनी योग्य नियोजन केल्याने गरजू महिलांना अनुदानाचा लाभ घेता आला.
- एस.एन. झा, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, चंद्रपूर