सोमनाथ देवस्थान परिसरात सभागृह बांधकामासाठी एक कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:19 AM2021-06-19T04:19:41+5:302021-06-19T04:19:41+5:30
१५ ऑगस्ट २०२० रोजी आ. मुनगंटीवार मारोडा येथे ग्रामपंचायतीद्वारे आयोजित कार्यक्रमाला गेले असता, नागरिकांनी सोमनाथ येथे सामाजिक सभागृहाचे बांधकाम ...
१५ ऑगस्ट २०२० रोजी आ. मुनगंटीवार मारोडा येथे ग्रामपंचायतीद्वारे आयोजित कार्यक्रमाला गेले असता, नागरिकांनी सोमनाथ येथे सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्याची मागणी केली. आ. मुनगंटीवार यांनी नागरिकांना त्यासंबंधी आश्वासनदेखील दिले. आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनी ग्रामविकास विभागाच्या ३० मार्च २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये २५१५ या लेखाशिर्षाअंतर्गत सोमनाथ येथील सामाजिक सभागृहाच्या बांधकामासाठी १ कोटीचा निधी मंजूर केला आहे.
श्री सोमनाथ मंदिर देवस्थान परिसर सौंदर्यीकरण व विकासासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत निधी मंजूर व्हावा, यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार प्रयत्नशील असून, याबाबत पर्यटन संचालनालयाशी त्यांचा पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू आहे. सोमनाथ देवस्थान परिसरात सभागृहाचे बांधकाम मंजूर झाल्यामुळे भाविकांसाठी मोठी सोय उपलब्ध झाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.