वरोऱ्यात एक दिवसीय लोकमत सखी महोत्सव

By admin | Published: January 26, 2016 12:42 AM2016-01-26T00:42:50+5:302016-01-26T00:42:50+5:30

लोकमत सखी मंच वरोरा तालुका व न.प. महिला बाल कल्याण समिती शहर अभियान व्यवस्थापन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांनी सखी महोत्सव साजरा करण्यात आला.

One day Lokmat Sakhi Mahotsav in Varori | वरोऱ्यात एक दिवसीय लोकमत सखी महोत्सव

वरोऱ्यात एक दिवसीय लोकमत सखी महोत्सव

Next

वरोरा : लोकमत सखी मंच वरोरा तालुका व न.प. महिला बाल कल्याण समिती शहर अभियान व्यवस्थापन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांनी सखी महोत्सव साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन महारोगी सेवा समिती आनंदवनचे विश्वस्त सुधाकर कडू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी न.प. अध्यक्षा जनाबाई पिंपळशेंडे, न.प. उपाध्यक्षा शकीला बेगमअय्यब पठाण, नगरसेविका लता हिवरकर, न.प. मुख्य लिपीक डॉ. प्रकाश कोटेचा, प्रा. प्रवीण खिरटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महिलांना आरोग्य विषय तसेच कायदे विषयक मार्गदर्शन भारती साबळे व अ‍ॅड. विद्या बुराण यांनी केले. बालविकास मंचमध्ये प्रथम सानिया आत्राम, द्वितीय कशिश आत्राम, तृतीय इंद्रायणी गजभे, कॉमेडी शो मध्ये प्रथम वंदना दडमल, द्वितीय स्नेहल गाठे, तृतीय निलिमा बांगरे, फॅशन शोमध्ये प्रथम विणा शेंडे, द्वितीय सोनाली पोकळे, तृतीय किर्ती कानोरे, प्रोत्साहनपर सारीका क्षिरसागर, निता गजभे, एकल नृत्य प्रथम सोनु दडमल, द्वितीय निता बोढे, तृतीय निर्मल वैद्य, युगल नृत्य निता बोंढे, हिमांशु बोंढे, समुह नृत्य प्रथम फेअरी अ‍ॅन्ड ग्रुप, द्वितीय मराठी सखी ग्रुप, तृतीय संयुक्ती ग्रुप यांनी पटकाविला. स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार बाळु धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. गणेश ताटकुंडवार, विजय पिंपळशेंडे, भोजराज झाडे, विशाल बदखल, मनोज दानव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी सखी मंचला सहकार्य करणारे उमेश कथडे, प्रशांत खापने, पंकज खाजोने, किशोर भोयर, दिलीप गजभे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन सोनाली पोकळे, मोनाली ताटकुंडवार, साक्षी शेंडे, संस्कृती वनकर, रजनी घुगल, सुषमा काकडे यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण नफीज, आनंद पटेल, रोहीनी, सीमा येवले यांनी केले. कार्यक्रमाला लोकमत सखी मंच वरोरा तालुका संयोजिका उज्वला खिरटकर, कल्पना ताटकुंडवार, ज्योती चोपने, सुनिता खामकर, सुशील पाल, कल्यानी वाभीटकर, शितल खाडे, कल्पना कथडे, खाजोने, विणा शेंडे, प्रतिभा जिवतोडे, सीमा वनकर, स्मिता चांभारे, शिरीष गावंडे, आश्विनी ढोमणे, मर्ल्लेवार, प्रांजली कोलशेट्टीवार, मेंढुलकर, मनिषा बुधे आदी सखींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: One day Lokmat Sakhi Mahotsav in Varori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.