मृत कामगाराच्या कुटुंबीयांना दिले एक दिवसाचे वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:29 AM2021-01-03T04:29:23+5:302021-01-03T04:29:23+5:30
घुग्घुस : येथील एएसडीसी ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये कार्यरत वाहनचालक चंदू पठाण (३८) याचा घरी काम करताना दुमजली इमारतीवरून खाली पडल्याने ...
घुग्घुस : येथील एएसडीसी ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये कार्यरत वाहनचालक चंदू पठाण (३८) याचा घरी काम करताना दुमजली इमारतीवरून खाली पडल्याने मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबीयांना इतर कामगारांनी आपले एक दिवसाचे वेतन देऊन आर्थिक मदत करून माणुसकीचा परिचय दिला.
चंदू पठाण यांच्या मृत्यूनंतर पत्नीवर दोन मुलाचे व आपल्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला होता.
त्यांना उदात्त हेतूने कंपनीच्या कामगारांनी एक दिवसाचे वेतन देण्याचा संकल्प करून, एक लाख ८१ हजार ३२२ रुपये गोळा करून त्यांच्या पत्नीला आर्थिक मदत केली.
यावेळी कंपनीचे इंचार्ज हृदयनाथ तिवारी, संकेत सिंग, संजीव कुमार झा, उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, अमित कुंभारे, सूरज मोरपाका, मोहम्मद अली, बबलू रामटेके, चिरंजीवी मेडसेनी, हंसराज लांडगे, निशी सोदारी, विशाल दुर्गे, हनीफ सिद्धीकी, मोगली लट्टा यांची उपस्थिती होती.