वन कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर

By admin | Published: August 24, 2014 11:24 PM2014-08-24T23:24:15+5:302014-08-24T23:24:15+5:30

राज्यातील वनरक्षक वनपालाच्या अन्यायकारक वेतनश्रेणीमध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी उद्या २५ आॅगस्टपासून वन कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत. घोषित करण्यात

One employee of the forest staff today | वन कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर

वन कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर

Next

चंद्रपूर : राज्यातील वनरक्षक वनपालाच्या अन्यायकारक वेतनश्रेणीमध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी उद्या २५ आॅगस्टपासून वन कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत. घोषित करण्यात आलेल्या बेमुदत संपाबाबत मध्यवर्ती वनराजिक महाविद्यालय चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या सभासदांची बैठक पार पडली.
बैठकीमध्ये सन १९७६ पासून वनरक्षक व वनपाल संवर्गातील वेतनश्रेणीमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र शासनाच्यावतीने कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. यामुळे वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांच्या नेतृत्वात उद्या २५ आॅगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. राज्यातील वनरक्षक व वनपालाच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याची मागणी सातत्याने १९७६ पासून सुरू असूनही शासनाच्या उदासिन धोरणामुळे दुर्लक्षीत केली जात आहे. मागील ३० वर्षांपासून वनमंत्री, वित्तमंत्री, वनराज्यमंत्री, प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याशी वेतनश्रेणी संदर्भात वारंवार चर्चा करून, निवेदन देऊनही मागणी निकाली काढण्यात आली नाही. वनरक्षकांचे व वनपालांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या गृह विभागातील पोलीस व उपनिरीक्षक आणि राजस्व विभागातील तलाठी व नायब तहसीलदार यांच्या पदाच्या समकक्ष आहे. मात्र वनरक्षक व वनपाल यांना इतर समकक्ष कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी वेतन मिळत आहे.
राज्य शासनाच्यावतीने सन २००८ मध्ये हकीम समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र वेळोवळी पत्रव्यवहार व चर्चा करुनसुद्धा वनरक्षक व वनपालांना न्याय देण्यात आला नाही. यामुळे वनरक्षक व वनपालांना आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे एकमताने ठराव पारित केला व २५ आॅगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब केला. यावेळी उपस्थित वनकर्मचारी व वनमजूर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत अंशत: कालावधीमध्ये काम केलेल्या रोजंदारी कामगारांना शासन सेवेत कायम करावे. वनमजुरांची सेवा ३० जून २००४ पासून ग्राह्य धरण्यात यावी. स्थायी वनमजुरांंना वनसेवक म्हणून संबोधण्यात यावे. वनमजूर म्हणून पदस्थापना झालेल्या वनमजुरांना वर्ग क च्या सर्व पदावर पदोन्नती देण्यात यावी. या मागणीसह वनमजूर संघटनेचे चंद्रपूर वनवृत्ताचे अध्यक्ष बंडू देशमुख यांनी वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या संपात चंद्रपूर वनवृत्तातील सर्व वनमजूर संपात सहभागी होतील असे घोषित करुन संपात पाठिंबा जाहीर केला.
बैठकीत वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे चंद्रपूर वनवृत्ताचे अध्यक्ष विशाल मंत्रीवार, सचिव शंकर देठेकर, कोषाध्यक्ष अशोक गेडाम, संघटक बी.के. तुपे, वनमजूर संघटनेचे वृत्त अध्यक्ष बंडू देशमुख, संतोष औतकर, संदीप मेश्राम, मध्य चांदा वनविभागाचे अध्यक्ष एस.व्ही. ताजणे, सचिव भारत मडावी, डी.एल. उमरे, मनिष निमकर, आर. डी. भौंड, एन.के. देशकर, एन. आर. चापले, आर. एम. धोडरे, डी. डी.मनबत्तुलवार, ए. बी. पॉलिकोंडावार, नरेश मडावी, नरेश सिडाम, धनराज गेडाम, गोविंदा तम्मीवार, बंडू परचाके, आर. व्ही. कन्नमवार, वैद्य, बुरडकर, श्याम गेडाम, होमराज भट, सपना मोडक, सागर गेडाम, उज्वला मडावी, वर्षा वाघ, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: One employee of the forest staff today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.