एक लाख २९ हजारांचे बोगस बियाणे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:19 AM2021-06-27T04:19:21+5:302021-06-27T04:19:21+5:30
शनिवारी राजुरा तालुक्यातील मौजा वरोडा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांना सादुजी गणुजी ...
शनिवारी राजुरा तालुक्यातील मौजा वरोडा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांना सादुजी गणुजी नांदेकर यांच्या शेतातील घरी बोगस बियाणे आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच कृषी विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सदर ठिकाणाची पाहणी केली असता सुभाष विठ्ठल तुम्मेवार (वय ४५, रा. रामपूर) यांनी चार पोते बोगस बियाणे शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. या चार पोत्यांत कोहिनूर ५५५ वाणाची ४५० ग्रॅमची ४७ पॅकेट, शक्तिगोल्ड वाणाची ४५० ग्रॅम वजनाची ४७ पॅकेट, जादू वाणाची ४५० ग्राम वजनाची ३३ पॅकेट, आर-६५९ वाणाची ४५० ग्रॅम वजनाची ३१ पॅकेट, अशा प्रकारे एकूण एक लाख २९ हजारांचे बोगस बियाणे जप्त करण्यात आले. सदर कारवाई सहायक पोलीस निरीक्षक झुरमुरे, पोलीस उपनिरीक्षक गेडाम, पोलीस शिपाई संघपाल गेडाम, अविनाश बोबडे, दिनेश मेश्राम, महिपत कुमरे, नारायण सोनुने, महेश माहूरपवार, कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी जी. डी. मोरे, तालुका कृषी अधिकारी व्ही. के. मकपल्ले, मंडल कृषी अधिकारी सी. के. चौहान, कृषी पर्यवेक्षक नितीन कांबळे यांनी केली.