एक लाख ४६ हजाराचा दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:27 AM2021-03-21T04:27:19+5:302021-03-21T04:27:19+5:30
चिमूर : चिमूर पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या पळसगाव पिपर्डा परिसरात गुप्त महितीच्या आधारे पळसगाव शिवारात सापळा रचत एक लाख ...
चिमूर : चिमूर पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या पळसगाव पिपर्डा परिसरात गुप्त महितीच्या आधारे पळसगाव शिवारात सापळा रचत एक लाख ४६ हजार ४०० रुपयाचा दारूसाठा चिमूर पोलिसांनी जप्त केला आहे. मात्र आरोपी पसार झाला असून, शोधकार्य सुरू आहे.
चिमूर तालुक्यातील पळसगाव, पिपर्डा परिसरात गौतम पाटील रा, गुजगव्हाण हा व्यक्ती अवैध दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलीस विभागास होताच, शुक्रवारी चिमूर येथील सहायक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विलास निमगडे, पोलीस अंमलदार सचिन गजभिये व सचिन खामनकर यांच्यासह पळसगाव परिसरात सापळा रचला. दुपारी ४ वाजताच्या सुमारास स्कॉर्पिओ वाहनाच्या चालकाने पळसगाव अमराई भडका नाल्यामधे वाहनातील दारूच्या पेट्या टाकून पळून गेला. फरार आरोपी गौतम पाटील याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून शोध सुरू आहे.