एक लाख चंद्रपूरकरांनी ना वाहतुकीचा नियम पाळला, ना दंड भरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:27 AM2021-02-13T04:27:04+5:302021-02-13T04:27:04+5:30

दिवसेंदिवस वाहनाच्या अपघाताची संख्या वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. मात्र वाहतूक पोलीस ...

One lakh Chandrapurkars neither obeyed traffic rules nor paid fines | एक लाख चंद्रपूरकरांनी ना वाहतुकीचा नियम पाळला, ना दंड भरला

एक लाख चंद्रपूरकरांनी ना वाहतुकीचा नियम पाळला, ना दंड भरला

Next

दिवसेंदिवस वाहनाच्या अपघाताची संख्या वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. मात्र वाहतूक पोलीस चिरीमिरी घेतात, असा नेहमीच आरोप होतो. त्यामुळे ऑनलाईन चालान ही संकल्पना सुरू करण्यात आली. याअंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनाचा फोटो काढून त्याला ऑनलाईन चालान पाठविण्यात येते. यासंदर्भात भ्रमणध्वनीवर संदेशही पाठविण्यात येतेा. मात्र या चालानसंदर्भात वाहनचालक गंभीर नसल्याचे दिसून येते. जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत जिल्ह्यातील पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सुमारे एक लाख आठ हजार ५६८ जणांवर कारवाई करून दोन कोटी ८९ लाख १६ हजार १५० रुपयाचा दंड आकारला. मात्र केवळ एक कोटी ४१ लाख ५४ हजार ४०० रुपयाचा दंड वसूल केला. तर एक कोटी ४८ लाख ३५ हजार ३५० रुपयाचे ई-चालान अनपेड आहे.

बॉक्स

डिव्हिजन कारवाई थकीत दंड

ब्रह्मपुरी ६९०० ४,१३,०००

चंद्रपूर ७५०८४ ८०,९१,५००

चिमूर २१२५ २,४२,९००

गडचांदूर २२०३ १,९३,२००

मूल ४८५१ ५,३३,०००

राजुरा ४७४१ ६,८६,८००

वरोरा ४८९९ ८,७५,९००

बॉक्स

तीन चालान झाल्यास वाहन जप्त

अनेक वाहनचालक नियमांचे उल्लंघन करुन वाहन चालवतात. पोलिसांनी ऑनलाईन चालान फाडले तर ते भरत नाही. तीनदा ऑनलाईन चालन फाडण्यात आले व वाहनचालकांनी थकीत ठेवले. तर वाहन जप्त करण्यात येत असते.

कारवाई १०८५६८ दंड २८९१६१५०

Web Title: One lakh Chandrapurkars neither obeyed traffic rules nor paid fines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.