एक लाख आठ हजारांचा सुगंधित तंबाखू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 10:48 PM2017-09-16T22:48:24+5:302017-09-16T22:48:43+5:30
दारूची वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीवरून मूल पोलीस गस्तीवर असताना नागपूरमार्गे चंद्रपूरकडे जात असलेल्या .....
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : दारूची वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीवरून मूल पोलीस गस्तीवर असताना नागपूरमार्गे चंद्रपूरकडे जात असलेल्या वेगन आर चार चाकी वाहन क्रं. एमएच ४० ए आर ३४४५ ची तपासणी केली असता त्याठिकाणी सुगंधित तंबाखूच्या २०० ग्रॅम वजनाचे १२०० पाकिट आढळून आले. यावरून मूल पोलिसांनी चारचाकी वाहनासह सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आले आहे. सदर कारवाई शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारात करण्यात आली आहे. अरुण हरिशचंद्र कटारिया (२६), प्रमोद पुुरषोत्तम कायरकर (२४) रा. उमरेड असे आरोपीचे नाव आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असतानाही दारूविक्रेते जुमानत नाही. दारूची अवैध वाहतूक करून विक्री करीत आहे. पोलीस दारूविक्री करणाºयांवर कारवाई करीत असतानाही दारूविक्रीचे प्रमाण अजुनही कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. नागपूरमार्गे चंद्रपूरला दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मूल पोलिसांना मिळाली.
माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे व पोलीस निरीक्षक जसवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम कुमरे यांनी चामोर्शी नाक्यावर पाळत ठेवली. अशातच अरूण हरिशचंद्र कटारिया (२६), प्रमोद पुुरुषोत्तम कायरकर (२४) रा. उमरेड हे वेगन आर चारचाकी वाहन क्र. एमएच ४० ए ३४४५ ने या ठिकाणी पोहचले. सदर वाहनाच्या सभोवताल काळ्या रंगाचे काचा असल्यामुळे पोलिसाना शंका आली. सदर वाहनाची तपासणी केली. या तपासणीत सदर वाहनात सुगंधीत तंबाखुच्या २०० ग्रॅम वजनातचे बाराशे पॅकेट आढळून आले.
पोलिसांनी सदर वाहन जप्त करून पोलीस स्टेशन येथे लावण्यात आले. सदर सुगंधीत तंबाखुची किंमत १ लाख ८ हजार रुपये आहे. तर वाहनाची किंमत २ लाख रुपये आहे. सदर सुगंधीत तंबाखुची वाहतूक केल्या प्रकरणी अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी अमरनाथ सोनटक्के यांनी आरोपींवर अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ कलम ३० (२) (अ) ३ (१) (झेड, झेड) (व्ही) शिक्षा कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे. सुगंधीत तंबाखूव बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू आहे. या अनुषंगाने तपास सुरू आहे.