२४ तासात एक पॉझिटिव्ह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:31 AM2021-08-22T04:31:22+5:302021-08-22T04:31:22+5:30

चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र, चंद्रपूर तालुका, बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, राजुरा, चिमूर, वरोरा व जिवती ...

One positive was found in 24 hours | २४ तासात एक पॉझिटिव्ह आढळला

२४ तासात एक पॉझिटिव्ह आढळला

Next

चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र, चंद्रपूर तालुका, बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, राजुरा, चिमूर, वरोरा व जिवती तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही. एकूण बाधितांची संख्या ८८ हजार ६०१ वर पोहोचली आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८७ हजार ९ झाली आहे. सध्या ५३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. सहा लाख ५८ हजार ११९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५ लाख ६७ हजार ९५८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १५३९ बाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोना पूर्णपणे संपला, या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: One positive was found in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.