२४ तासात पुन्हा एक हजार २६ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:36 AM2021-04-30T04:36:06+5:302021-04-30T04:36:06+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यात २४ तासात पुन्हा एक हजार २६ जणांनी कोरोनावर मात केली आहे तर १ हजार २२४ नवीन ...
चंद्रपूर : जिल्ह्यात २४ तासात पुन्हा एक हजार २६ जणांनी कोरोनावर मात केली आहे तर १ हजार २२४ नवीन बाधितांची भर पडली असून, २० बाधितांचा मृत्यू झाला आहे. मागील चार दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे पुढे येत आहे.
जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ५६ हजार ९०४वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ४० हजार ३४४ झाली आहे. सध्या १५ हजार ७१२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३ लाख ६८ हजार ४३८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३ लाख ६ हजार ६४१ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ८४८ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ७८३, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली २७, यवतमाळ २५, भंडारा सात, गोंदिया एक, वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे. नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा व ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी कोरोनाची लस घ्यावी. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
असे आहेत मृतक
आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपुरातील जयराज नगर, तुकूम येथील ५३ वर्षीय पुरूष व ६५ वर्षीय महिला, फुले चौक परिसरातील ७२ वर्षीय पुरुष, ऊर्जानगर येथील ४० वर्षीय पुरूष, ६७ वर्षीय पुरूष, बिनबा वार्ड येथील ३४ वर्षीय पुरूष व ६० वर्षीय पुरूष, ६५ वर्षीय महिला, घुग्घुस येथील ५८ वर्षीय पुरूष, वडगाव येथील ७० वर्षीय पुरूष, राजुरा तालुक्यातील विरूर येथील ६७ वर्षीय महिला, मूल तालुक्यातील ८० वर्षीय पुरूष, वरोरा तालुक्यातील ६३ वर्षीय पुरूष, कोरपना तालुक्यातील वनसडी येथील ६८ वर्षीय पुरूष, गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील ४५ वर्षीय महिला, चिमूर तालुक्यातील जामगाव येथील ४८ वर्षीय पुरूष, ब्रह्मपुरी तालुक्यातील हनुमान नगर येथील ६८ वर्षीय पुरूष, नागभीड तालुक्यातील ७० वर्षीय महिला, भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील ७५ वर्षीय पुरूष, सिंदेवाही तालुक्यातील ५१ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.
तालुकानिहाय बाधित
चंद्रपूर मनपा क्षेत्र ४२४
चंद्रपूर तालुका ६५
बल्लारपूर ९५
भद्रावती १४३
ब्रह्मपुरी ५०
नागभीड ४२
सिंदेवाही २२
सावली ४४
पोंभुर्णा ०४
गोंडपिपरी २७
राजुरा ५९
चिमूर ९४
वरोरा १०९
कोरपना २६
जिवती ०७
अन्य १३