कांदा ५० रुपयांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:22 AM2019-09-10T00:22:46+5:302019-09-10T00:23:25+5:30
बाजारात गेल्या महिन्याच्या १८ ते २० रुपये किलोच्या तुलनेत सध्या लाल कांद्याचे भाव ३५ रुपये आणि पांढºया कांद्याचे भाव ४० ते ४५ रुपयांवर पोहोचले आहेत. या तुलनेत किरकोळमध्ये ५० रुपये भावाने कांदा विकला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : किरकोळ बाजारात कांदा प्रतवारीनुसार ५० रुपये किलोपर्यंत विकण्यात येत असल्याने नेहमी शेतकऱ्यांना रडविणाऱ्या कांद्याने आता रडविण्याचा गुणधर्म पुन्हा एकदा सामान्य नागरिकांना दाखविला आहे. ठोक बाजारात भाव ३० ते ३५ रुपये आहेत. त्यापेक्षा कमी भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. त्याचा फायदा शेतकरी आणि ग्राहकांना न होता व्यापाºयांना अधिक होत असल्याची परिस्थिती आहे. भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बाजारात गेल्या महिन्याच्या १८ ते २० रुपये किलोच्या तुलनेत सध्या लाल कांद्याचे भाव ३५ रुपये आणि पांढºया कांद्याचे भाव ४० ते ४५ रुपयांवर पोहोचले आहेत. या तुलनेत किरकोळमध्ये ५० रुपये भावाने कांदा विकला जात आहे.
यंदा ५० टक्के पीक कमी
गेल्या वर्षी कांद्याला भाव न मिळाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यावर्षी कमी लागवड केली. शिवाय पावसामुळे बराच कांदा जमिनीतच खराब झाला आहे. त्यामुळे यंदा कांद्याचे पीक नेहमीच्या तुलनेत ५० टक्के कमी येण्याची शक्यता आहे.
उन्हाळ्यात सुरुवातीला कांद्याचे भाव ८ ते १० रुपये असल्यामुळे बहुतांश शेतकºयांनी कांद्याचा स्टॉक केला. तो कांदा आता शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारात आणला आहे. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. हा स्टॉक दिवाळीपर्यंत येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना उन्हाळ्याच्या तुलनेत सध्या जास्त भाव मिळत आहे. यामध्ये मात्र सामान्य नागरिकांना अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे.