वडगाव येथे ऑनलाईन सुसंस्कार शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:19 AM2021-06-11T04:19:46+5:302021-06-11T04:19:46+5:30

कोरपना : श्री गुरुदेव सेवा मंडळ तालुका कोरपना तर्फे दरवर्षी सुसंस्कार शिबिर घेण्यात येते. यावर्षी मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे मे ...

Online culture camp at Wadgaon | वडगाव येथे ऑनलाईन सुसंस्कार शिबिर

वडगाव येथे ऑनलाईन सुसंस्कार शिबिर

Next

कोरपना : श्री गुरुदेव सेवा मंडळ तालुका कोरपना तर्फे दरवर्षी सुसंस्कार शिबिर घेण्यात येते. यावर्षी मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे मे महिन्यातील शिबिर ऑनलाईन पद्धतीने वडगाव येथे आता घेण्यात आले.

या सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून जात धर्माच्या पलीकडे जाऊन मानवता धर्माची शिकवण दिली जाते. योगासन, लाठी काठी, प्राणायाम, कराटे आदीचे प्रशिक्षण देण्यात आले. या शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रामगीताचार्य डाखरे महाराज, आकाश मडावी, धनंजय डाखरे यांनी प्रशिक्षण देण्याचे कार्य केले. चंद्रपूर जिल्ह्यात १९९८ पासून सुसंस्कार शिबिर घेण्यात येते. तेव्हापासून ही परंपरा अविरतपणे सुरू आहे. या शिबिरात राष्ट्रधर्म युवा मंच कोरपना तालुक्याची कार्यकारिणी गठित करण्यात आली. यात तालुकाध्यक्ष श्रीकांत आसुटकर, उपाध्यक्ष विशाल टिकले, सचिव आकाश मडावी, कोषाध्यक्ष धीरज मोहितकर, संपर्क प्रमुख नितीन श्रीरामवार, प्रसिद्धी प्रमुख अविनाश आगलावे, संघटक संतोष जेनेकर, सहसचिव प्रशांत बल्की, प्रवक्ता म्हणून तुकाराम कोकणारे यांची वर्णी लागली. सदर शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाला श्रीवास्तव, डिसूजा, रत्नाकर चटप आदी उपस्थित होते.

Web Title: Online culture camp at Wadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.