‘ऑनलाईन एज्यूकेशन’ने बिघडविले हस्ताक्षर अन् लिहिण्याची गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:26 AM2021-03-28T04:26:22+5:302021-03-28T04:26:22+5:30
बॉक्स विद्यार्थ्यांनो हे करा १) जास्त वेळ मोबाईल बघत राहल्याने ट्रेस निर्माण होत असतो. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण झाल्यानंतर वेगवेगळ्या ...
बॉक्स
विद्यार्थ्यांनो हे करा
१) जास्त वेळ मोबाईल बघत राहल्याने ट्रेस निर्माण होत असतो. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांचे वाचन करावे. जनरल नॉलेजच्या पुस्तकांचे वाचन करावे, लिखाणाचा सराव करावा.
२) मन एकाग्र करण्यासाठी ध्यान करावा. त्यामुळे अभ्यासात मन लागेल. हस्ताक्षर सुधारण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके येतात. परंतु, नियमित लिखाण केले तर त्याचा वापर करण्याची गरज नाही.
३) विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये जास्त वेळ न घालविता, वेळेचे नियोजन करावे. पुस्तकाला मित्र करावे. नियमित वाचन केल्याने विचारांच्या कक्षा रुंदावतात.
बॉक्स
मराठी विषयाचे तज्ज्ञ म्हणतात
ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. तेव्हापासून विद्यार्थ्यांचा लिखाणाचे काम कमी झाले आहे. त्यामुळे हस्ताक्षरावर, तसेच लिहिण्याच्या गतीवर परिणाम झाला आहे. सुंदर हस्ताक्षरासाठी सराव गरजेचा असतो. त्यामुळे पालकांनी याकडे लक्ष देऊन आपल्या पाल्याकडून सराव करून घेणे गरजेचे आहे.
वैशाली दुर्योधन
हस्ताक्षर तज्ज्ञ तथा मुख्याध्यापक
--------
ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला आहे. परिणामत: लिखाणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या शुद्ध लेखनात उणिवा जाणवतात. याचा परिणाम मराठी भाषेवर होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शुद्धलेखनाकडे जास्तीत जास्त भर देऊन लिहिण्याचा नियमित सराव करावा.
- प्रा. डॉ. विजया गेडाम, चंद्रपूर
------
पूर्वी ज्याप्रमाणे मुलगी घरी लिखाण करीत होती. आता त्याप्रमाणे लिखाण करताना दिसत नाही. मोबाईलवरच शिक्षण असल्याने मोबाईल बघत असते. त्यामुळे लिखाणाची गती कमी झाली आहे.
उत्तम खडसे, चंद्रपूर
------
मोबाईल हे दृकश्राव्य माध्यम असल्याने ऑनलाईन शिक्षणाद्वारे लिखाणाचे काम कमी झाले आहे. परिणामी हस्ताक्षरात बिघाड झाला असून, गतीसुद्धा मंदावली आहे.
राजेश गेडाम, चंद्रपूर