विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन उपस्थिती व सेल्फीवर बहिष्कार

By admin | Published: January 10, 2017 12:46 AM2017-01-10T00:46:41+5:302017-01-10T00:46:41+5:30

राज्यातील प्राथमिक शाळांची विद्यार्थी व शाळा डाटाबेस सरल प्रणाली, एम. डी. एम शिष्यवृत्ती माहिती, ...

Online presence of students and self-government boycott | विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन उपस्थिती व सेल्फीवर बहिष्कार

विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन उपस्थिती व सेल्फीवर बहिष्कार

Next

शिक्षक संघटनांमध्ये रोष : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
चंद्रपूर : राज्यातील प्राथमिक शाळांची विद्यार्थी व शाळा डाटाबेस सरल प्रणाली, एम. डी. एम शिष्यवृत्ती माहिती, शालार्थ वेतन प्रणाली, आधार कार्ड माहिती यासारखी शाळेची सर्व माहिती आॅनलाईन भरली जात आहे. त्यातच ३ नोव्हेंबरला विद्यार्थ्यांची सेल्फी काढण्याचा शासन निर्णय निर्गमीत करून नव्या वर्षात या निर्णयाची अमलबजावणी करण्याचे आदेश दिले. या निर्णयावर जिल्ह्यातील बारा शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त करीत दर सोमवारी सेल्फी काढून पाठविण्याच्या सरल प्रणालीवर बहिष्कार टाकला.
विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन उपस्थितीसाठी अ‍ॅप तयार करण्यात आली असून या अ‍ॅपवर दररोज उपस्थिती नोंदविण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये संगणक व इंटरनेटची सुविधा नाही. मोबाईल कव्हरेज सुद्धा राहत नाही. त्यामुळे आॅनलाईन उपस्थिती सादर करणे शिक्षकांना कठीण आहे.
शिवाय या कामात शिक्षकांचा वेळ वाया जाणार आहे. पुर्वीच शिक्षणाचे व शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यातच आॅनलाईन माहिती, सेल्फीसारखे निर्णय घेऊन शिक्षकांच्या अडचणी वाढविल्या आहेत. त्यामुळे या निर्णयावर फेरविचार करून निर्णय रद्द करावा, यासाठी जिल्ह्यातील बारा शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

या संघटनांचा बहिष्कार
नववर्षापासून महिन्याच्या दर सोमवारी वर्गाचा सेल्फी काढून सरल प्रणालीवर पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहे. या निर्णयावर बारा शिक्षक संघटनांनी सोमवारी बहिष्कार टाकला व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, अखिल चंद्रपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र प्रदेश केंद्रप्रमुख संघ, महाराष्ट्र पदविधर शिक्षक व केंद्रप्रमुख संघ, महाराष्ट्र राज्य ग्रेड मुख्याध्यापक महासंघ, मुख्याध्यापक असोशिएशन, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद, प्राथमिक शिक्षक भारती या संघटनांचा समावेश आहे.

Web Title: Online presence of students and self-government boycott

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.