३१३८ वीज ग्राहकांनी स्वत:च पाठविले ऑनलाइन रीडिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:30 AM2021-05-07T04:30:11+5:302021-05-07T04:30:11+5:30
कोरोना संकटात वीज ग्राहकांना स्वत:हून मीटर रीडिंग पाठविण्याची सोय महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ ...
कोरोना संकटात वीज ग्राहकांना स्वत:हून मीटर रीडिंग पाठविण्याची सोय महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीज जोडणीच्या मीटरचे छायाचित्र रीडिंग घेतली जाते. ग्राहकांना मीटरच्या रीडिंगसाठी दरमहा निश्चित तारखेच्या एक दिवसआधी रीडिंग पाठविण्याची एसएमएसद्वारे आवाहन केले. तेव्हापासून ग्राहकांना स्वत:हून मोबाइल अॅप किंवा एसएमएसद्वारे मीटरमधील केडब्लूएच रीडिंग पाठविण्याला प्रतिसाद मिळू लागला. महावितरण मोबाइल अॅपमध्ये सबमीट मीटर रीडिंगवर क्लिक करून मीटरमधील केडब्लूएच रीडिंगचा (केडब्लू किंवा केव्हीए वगळून) छायाचित्र काढून सबमीट करता येते. वीजग्राहकांना स्वत:हून रीडिंग पाठविल्यास मीटर व रीडिंगकडे नियमित लक्ष ठेवा, अशी माहिती महावितरणने दिली आहे.
विविध तक्रारींचाही निपटारा
वीज वापरावरही नियंत्रण ठेवणे सोपे झाले. मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास त्याची तत्काळ तक्रार करता येईल. वीज बिलांबाबत तक्रारी उद्भवणार नाहीत. रीडिंग अचानक वाढल्यास त्याची कारणे शोधून तक्रार करता येते. रीडिंग पाठविण्यासाठी प्रत्येक महिन्यात केवळ दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागतो. यासह विविध फायद्यांमुळे वीज ग्राहकांनी दरमहा मीटर रीडिंग पाठवावे, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी केले आहे.