कोरोना ओसरण्याच्या मार्गावर फक्त १५ रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:20 AM2021-06-22T04:20:00+5:302021-06-22T04:20:00+5:30
जिल्ह्यात बाधित आढळलेल्या १५ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ६, बल्लारपूर ५, भद्रावती १, गोंडपिपरी १, वरोरा येथील २ रुग्णांचा ...
जिल्ह्यात बाधित आढळलेल्या १५ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ६, बल्लारपूर ५, भद्रावती १, गोंडपिपरी १, वरोरा येथील २ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ५६७ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८२ हजार ४०७ झाली आहे. आतापर्यंत ५ लाख ३७ हजार ३९३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४ लाख ५० हजार ६३५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १५१८ बाधितांचे मृत्यू झाले आहे.
११ तालुक्यात एकही रुग्ण नाही
जिल्हा प्रशासनाने निर्बंध उठविल्याने सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. मात्र २४ तासात ११ तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळला नाही. यामध्ये चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली, पोंभुर्णा, कोरपना, जिवती, राजुरा व चिमूर तालुक्याचा समावेश आहे. कोरोना ओसरण्याच्या मार्गावर लागला. परंतु आरोग्य यंत्रणेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे लक्ष दिल्या जात आहे.
काळजी घ्यावीच लागणार
नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला, या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.